न्यू इंग्लिश स्कुल कौलगे शाळेमध्ये स्पर्धा परीक्षांवर मार्गदर्शन

0

कौलगे ( वार्ताहर ) – येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये ‘शोध सामर्थ्याचा..ओळख स्पर्धा परीक्षांची’ ह्या विषयावर शिवराज कॉलेजच्या प्राध्यापिका कु.श्रुती पाटील यांचे मंगळवार (दि.५) रोजी मार्गदर्शन झाले.
आजच्या घडीला स्पर्धा परीक्षा ह्या महत्वाच्या आहेत व ह्याचे महत्व पटवून देण्यासाठी गडहिंग्लजचे तहसीलदार श्री.रामलिंग चव्हाण यांच्या कल्पनेतून ह्या मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे मुख्यध्यापक श्री. एकनाथ देसाई यांनी प्रा. श्रुती पाटील यांचे स्वागत करून केली. त्यानंतर श्री. नामदेव यादव यांनी परिचय करून दिला. त्यानंतर प्रा. श्रुती पाटील यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांकडून ही ह्या मार्गदर्शनला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा विध्यार्थ्यांना भावी जीवनात व शिक्षणात नक्कीच फायदा होणार आहे.
या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विध्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. बळीराम पाटील यांनी केले तर आभार एकनाथ देसाई यांनी मानले.

o

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here