शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल कौलगेला धवल यश

0

कौलगे (गडहिंग्लज) : येथील शासकीय चित्रकला स्पर्धेत न्यू इंग्लिश शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे.         शाळेतील विद्यार्थ्यांनी इलिमेंट्री व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेत धवल यश संपादन केले. इलिमेंट्री परीक्षेत १५ पैकी १५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामध्ये कु.ईश्वरी पाटील, कु.अभय लाड, कु. आदित्य पोवार व कु. ऋशिकेष पाटील पाटील यांना ”बी” ग्रेड मिळाला.

त्याचबरोबर इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेत ४० पैकी ४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामध्ये कु. दिव्या दावणे व कु. प्रथमेश वांगणेकर यांना ”ए” ग्रेड मिळाला.
या परीक्षेसाठी श्री. दीपक सावंत व श्री. विनायक भुईवर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच माजी मुख्याध्यापक श्री. काशिनाथ गाडे व शाळेचे मुख्याध्यापक श्री. एकनाथ देसाई यांचे प्रोत्साहन मिळाले. सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here