समाजाच्या उन्नतीसाठी सामूहिक प्रयत्नांची गरज – कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे

0

कोल्हापूर : विद्यापीठ परिक्षेत्रातील उद्योजक समुहाने पुढे ये विद्यापीठातील संशोधनाप्रती सकारात्मक भाव दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत, ी महत्त्वाची बाब आहे. विद्यार्थी, संशोधक आणि उद्योजकांनी संशोधनाच्या माध्यमातून समाजाची उन्नती साधण्यासाठी सामूहिकरित्या प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे यांनी आज येथे केले.

      शिवाजी विद्यापीठाच्या विद्यापीठ उद्योजक संवाद कक्ष आणि कोल्हापूर उद्योजक सम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजितविद्यापीठ-उद्योजक भेटही एकदिवसीय कार्यशाळवनस्पतीशास्त्र अधिविभागाच्या निलांबरी सभागृहा आज झाली. या कार्यशाळेच्या द्घाटनप्रसंगी कुलगुरू डॉ. शिंदे बोलत होते. यावेळी तज्ज्ञ उद्योजक एम.बी. शेख प्रमुख उपस्थित होत.

      कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय दर्जाची उपलब्ध साधन सामुग्री संशोधक विद्यार्थी आणि उद्योजकांना त्यांच्या क्षेत्रामध्ये नवनिर्मिती करण्यासाठी सहाय्यभूत ठरणार आहेत. त्यांचा लाभ समाजोपयोगी संशोधन आणि उत्पादनासाठी करण्याची गरज आहे.

      उद्योजक एम.बी. शेख म्हणाले, विद्यापीठातील कमवा शिका योजनेतील इच्छुक विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनासह वडीच्या क्षेत्रा कामाचा अनुभव प्राप्त होण्यासाठी उद्योजक निश्चित प्रयत्न करणार आहेत.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के यांनीही मार्गदर्शन केले. अधिष्ठाता डॉ. ए.एम. गुरव यांनी प्रास्ताविक केले. कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर यांनी आभार मानले. यावेळी अधिष्ठाता डॉ. पी.एस. पाटील, डॉ. एस.डी. डेलेकर, डॉ. ए.व्ही. घुले यांच्यासह श्री.शहा, श्री.शेख, श्री.शेटे, श्री.पुष्कर, श्री.वाडेकर तसेच नामवंत उद्योजक, विद्यार्थी, विद्यार्थिनी, संशोधक, शिक्षक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here