राष्ट्रवादीची डहाणू प्रांत कार्यालयावर धडक

0

पालघर – योगेश चांदेकर

पालघर – केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या सदोष धोरणाला विरोध करण्यासाठी सोमवारी आमदार आनंद ठाकुर यांच्या नेतृत्वाखाली डहाणू प्रांत कार्यालयावर राष्ट्रवादीने धडक दिली. यावेळी सरकारविरुद्ध निदर्शने करण्यात आली. भारनियमन रद्द करा, बुलेट ट्रेन रद्द करणे, पाटबंधाऱ्यांची दुरूस्ती करणे. डहाणूत सुका दुष्काळ जाहिर करा, वादळामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत नुकसान भरपाई करणे, आदिवासी वस्तीगृहामध्ये प्रतिक्षा यादीमधील विदयार्थ्यांना प्रवेश देणे आदि मागण्यांचे निवेदन तहसिलदार राहुल सारंग यांनी स्विकारले.

शासनाच्या लोकविरोधी धोरणामुळे सामान्य गोरगरिब जनतेला जगणे मुश्किल झाल्याने सरकारी धोरणाचा निषेध केला. यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा, राजेश पारेख, मिहीर शहा, करण ठाकूर, तालुका अध्यक्ष काशीनाथ चौधरी, शैलेश राकामुथा, तन्मय बारी, सुरेंद्र पाटील, जि.प. सदस्या दीपा ठेमका, अमिता पटेल, पं.स. सदस्य प्रवीण गवळी, नगरसेविका किर्ती मेहता, रेणुका राकामुथा या प्रमुख पदाधिकारींसह कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान आदिवासी प्रकल्पांतर्गत यावर्षी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश न मिळालेल्या हजारो विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने प्रवेश दिला पाहिजे. तसेच सणासुदीला तालुक्यातील गाव खेड्यात भारनियमनामुळे लोकांची दिवाळी अंधारात जाणार असल्याचे सांगून ठाकूर यांनी सरकारवर टीका केली व भारनियमन तात्काळ रद्द करण्याचीही मागणी त्यांनी यावेळी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here