राष्ट्रवादी काँग्रेसचे हल्लाबोल आंदोलन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दिग्गज नेत्यांची हल्लाबोल आंदोलनाला हजेरी

0

तुळजापूर : भाजप-शिवसेना सरकार विरोधात भवानी मातेचे दर्शन घेत  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनाला सुरुवात झालीय.

हल्लाबोल यात्रेत सहभागी झालेल्या सर्व नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळयाला पुष्पहार अर्पण करुन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळयाला अभिवादन केले.

या आंदोलनाच्या सुरुवातीला भवानीमातेच्या प्रांगणामध्ये भाजप-शिवसेना सरकारच्याविरोधात गोंधळ घालण्यात आला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नेत्यांनी तुळजापूरच्या तहसिलदारांना सरकारविरोधी निवेदन सादर केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मराठवाडयातील हल्लाबोल आंदोलनाला आजपासून सुरुवात झाली आहे. या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, माजी उपमुख्यमंत्री आणि विधीमंडळाचे नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here