शेतकरी उध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे हल्लाबोल – अजित पवार

उदयाच्या निवडणूकांमध्ये खासदार आणि सहाच्या सहा आमदार राष्ट्रवादीच्या घडयाळाचे असले पाहिजेत अजित पवार

0

प्रतिनिधी : शशांक पाटील

बीड – गेवराईत हल्लाबोल यात्रेत अजित पवार यांनी सरकारवर जोरदार टिका केली.  माझा शेतकरी उध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्यानेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हे हल्लाबोल आंदोलन सुरु केल्याचे पवार यांनी सांगितले. जोपर्यंत समाजातील वेगवेगळया घटकाला न्याय मिळत नाही तोपर्यंत सरकारविरोधातील हा एल्गार असाच सुरु ठेवणार असल्याचा इशारा विधीमंडळाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.

आज बीड जिल्हयातील गेवराई तालुक्यामध्ये जगदंब आयटीआय कॉलेजच्या मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विराट अशी सभा पार पडली.

अजित पवार यांनी आपल्या भाषणामध्ये आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाही परंतु जर कुणी आरे ला कारे म्हणत असेल तर त्याला जशाच तसे उत्तर दया असे स्पष्ट करतानाच २०१४ च्या निवडणूकीमध्ये राष्ट्रवादीला दणका दिला तसा दणका देवू नका तर उदयाच्या निवडणूकांमध्ये खासदार आणि सहाच्या सहा आमदार राष्ट्रवादीच्या घडयाळाचे असले पाहिजे असे आवाहन गेवराई आणि मराठवाडयातील जनतेला केले. हे सांगतानाच पक्षाने जनतेच्या मनातील उमेदवार दयावा असेही स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here