सोयाबीनच्या योग्य दरासाठी राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक

0

इम्तियाज मुजावर

सोयाबीनला योग्य दर मिळत नसल्याच्या कारणावरून राष्‍ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. शनिवारी सकाळी कार्यकत्यांनी सातारा जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर सोयाबिनची पोती ओतून सरकारचा निषेध केला. तसेच पालकमंत्री विजय शिवतारे व पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांच्या गाड्यांचा ताफा अडवून मंत्र्यांना जाब विचारला.

सोयाबीनला योग्य दर मिळावा अशी शेतकर्‍यांची मागणी आहे. सरकारकडून या प्रकणी दुर्लक्ष केले जात आहे. त्यासाठी राष्‍ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. शनिवारी सातार्‍यात आलेल्या पालकमंत्री विजय शिवतारे आणि मंत्री महादेव जानकर यांच्या गाड्या संतप्‍त कार्यकर्त्यांनी अडविल्या. यावेळी सोयाबीनच्या दराबाबत होत असलेल्या दुर्लक्षासाठी मंत्र्यांना जाब विचारून सरकारच्या धोरणाचा निषेध केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here