उद्धव ठाकरे यांच्या ‘धाडसा’चे आम.मुश्रीफ यांच्या कडून कौतुक

0

उद्धव ठाकरे यांच्या ‘धाडसा’चे आम.मुश्रीफ यांच्या कडून कौतुक

मुरगूड प्रतिनिधी
राफेल प्रकरणात ‘पहारेकरीच चोर आहे’, ‘राज्याच्या दौऱ्यात कर्जमाफी झाली असे सांगणारा एकही शेतकरी भेटला नाही’ असे सरकारमध्ये राहूनही जाहीरपणे छातीठोक सांगण्याचं धाडस करणाऱ्या शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे जाहीर अभिनंदन असे उदगार राष्ट्रवादीचे नेते आम.हसन मुश्रीफ यांनी काढले.
कुरुकली ता कागल येथे उज्वला गॅस वितरण योजना, कौशल्य विकास योजनेअंतर्गत महिलांना प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वितरण व महिला मेळावा अशा संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते. मुश्रीफ यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पंढरपूर येथील भाषणाचा संदर्भ घेऊन त्यांनी विरोधकांचीच भूमिका सरकार मध्येच राहून आणि कोणत्याही दबावाला न जुमानता मांडली याबद्दल त्यांचे कौतुक केले.
आम.मुश्रीफ म्हणाले मोदी शासनाने गोरगरिबांना खोटी आश्वासने देऊन भुलवले.श्रीमंतांचा काळा पैसा पांढरा केला.देशाचा विकास दर तीन टक्क्याने घसरला.निरव मोदी,मल्या,चोक्सी यांनी गोरगरिबांच्या कष्टातून उभा राहिलेला भारतीय पैसा लुटला पण सामान्य भारतीयांच्या लोक कल्याणकारी योजना चालवायला यांच्या कडे पैसे नाहीत.गोरगरिबांची हाय यांना लागल्याशिवाय राहणार नाही. केंद्र सरकारच्या योजना या कोण्या व्यक्तीच्या, पक्षाच्या किंवा गटाच्या योजना नव्हेत त्या लोकांच्या कर रूपाने जमा महसुलातून उभ्या राहतात. उज्वला गॅस योजनेत मोफत गॅस दिले जात नाहीत तर सिलेंडर च्या रकमेतून 1600 रुपये कपात केले. जातात असे न करता या योजनेत 1600 रुपयांची कपात करू नये तसेच सिलेंडरची किंमत 500 रुपये करावी अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी उज्वला गॅस,कौशल्य विकास कार्यक्रमातील महिला प्रशिक्षणार्थ्यांना आम मुश्रीफ यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. मनीषा पाटील, मोहन भोगले,सारिका पाटील,द्रौपदी सुतार, सागर डवरी,लिंगाप्पा कांबळे, एस डी कांबळे यांचा विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल आम मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी माजी सरपंच दीपा कुदळे, बी. आर.पाटील,व्ही.डी.पाटील यांचे मनोगत झाले. स्वागत प्रास्ताविक विकास पाटील यांनी केले.सूत्रसंचालन विशाल बेलवळेकर यांनी तर आभार उपसरपंच महेश पाटील यांनी मानले. धोंडीराम बेलवळेकर, रंगराव पाटील,सुमनताई लकडे,नारायण ढोले,सौ अर्चना पाटील,निलेश शिंदे, विठ्ठलआण्णा कांबळे, मयूर आवळेकर, निलेश शिंदे, उपस्थित होते.

6 जानेवारी पासून महिला मेळाव्याचे आयोजन …….
आघाडी सरकारच्या काळात 21000 लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार पेन्शन सुरु केली. खोट्या तक्रारी करून त्यापैकी 4000 लोकांच्या पेन्शन बंद करून गरिबांच्या चुलीत पाणी ओतण्याचे काम विरोधकांनी केले. त्या सर्व पेन्शन पुन्हा सुरु करणे तसेच गरिबांना अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत 2 रुपये किलोने मिळणारे तांदूळ गहू या सरकारने बंद केले ते पुन्हा सुरु करावे. बांधकाम मजुरांना महिना 3000 व दिवाळीला 5000 रुपये मिळावेत या मागण्या आमच्या आहेत. गरिबांची चूल चालण्यास उपयुक्त योजना बंद केल्यामुळे त्याचा सर्वाधिक फटका महिलांना बसला आहे.त्यांचं हाता तोंडचं गणित बिघडून गेले आहे.शासनाचे डोळे उघडण्यासाठी व मागण्या मान्य करवून घेण्यासाठी महिला मेळावे भरवणार आहे अशी माहिती आम मुश्रीफ यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here