नाशिक, अहमनगर, जळगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

0

 राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी असून शेतकरी बांधवांच्या भावनांशी खेळणाऱ्या भाजप-शिवसेना युती सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस आक्रमक आक्रमक आंदोलने करत आहे. आज उत्तर महाराष्ट्रात नाशिक, अहमदनगर आणि जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालायावर मोर्चा काढून निवेदनाव्दारे राज्य व केंद्र सरकारकडे विविध मागण्या केल्या. यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष दिलीपराव वळसे पाटील, माजी मंत्री मधुकरराव पिचड, आमदार अरुणकाका जगतापअंकुशराव काकडे, चंद्रशेखर घुले पाटील, दादाभाऊ कळमकर, आमदार वैभवराव पिचड आणि आमदार संग्रामभैय्या जगताप उपस्थित होते.

शेतक-यांची संपूर्ण सरसकट कर्जमाफीची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाच्या दरात प्रचंड प्रमाणात घसरण झालेली असून सरकारने पेट्रोल, डीझेल व गस यांचे दर त्वरित कमी करण्यात यावे.  खूप जागावाजा करून या सरकारने मेकइन इंडिया, मेकइन महाष्ट्र सारख्या घोषणा दिल्या. परंतु बेरोजगारी वाढतच आहे असल्याने असंख्य कुशल व अकुशल कामगारांना तात्काळ रोजगार उपलब्ध करण्यात यावा, अशा मागण्या निवदेनाद्वारे करण्यात आल्या.

सध्याच्या परीस्थित शेतकरी हाच सर्वाधिक दुखी घटक असून शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीला केंद्र व राज्यातील भाजप शिवसेना युती सरकारच जबाबदार असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार यांच्या नेतृत्वाने सटाणा येथे बैलगाडीवरून मोर्चा काढत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी आमदार संजय चव्हाण, किसान सेलचे प्रदेश उपाध्यक्ष खेमराज कोर, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी उपस्थित होते.

 सरकारने मध्यंतरी शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली. परंतु यात शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी न देता विविध निकष घातल्याने शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा झाला नाही. तसेच कर्जमाफी जाहीर झाल्यानंतर देखील शेतकरी आत्महत्या कर आहेत. बागलाण तालुक्यात महिला शेतकरी भगिनीने देखील आत्महत्या केल्याचे भयानक वास्तव असून याला भाजप शिवसेना युती सरकारच जबाबदार असल्याचा आरोप देखील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्र पगार यांनी यावेळी बोलतांना केला आहे.

 महागाई,पेट्रोल-डिझेल,सरसकट शेतकरी कर्जमाफी मिळावी ,कपाशीला सात हजार रुपये भाव मिळावा,अंजनी-गिरणा धरणाचे पाणी मिळावे,व इत्यादी प्रमुख मागण्यांसाठी आज एरंडोल-पारोळा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस जळगांवचे जिल्हाध्यक्ष माजी मंत्री सतीशअण्णा पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.

यावेळी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ.सतीशअण्णा पाटील, अरुण भाई गुजराथी , वसंतराव मोरे ,माजी मंत्री गुलाबराव देवकर , रवींद्र भैय्या , माजी आमदार अरुण पाटील ,कार्याध्यक्ष विलास पाटील, माजी आ.राजीवदादा देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष हाजी गफ्फार मलिक, विकास पवार , संजय गरुड,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा.ललीतदादा बागुल, माजी युवक जिल्हाध्यक्ष मा.योगेश देसले,महिला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा सौ.कल्पना ताई पाटील, प्रदेशपाध्यक्षा विजया ताई पाटील,राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा कु.कल्पिता पाटील, व इतर अनेक आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here