विज्ञान जगायला शिका : प्राचार्य एस आर पाटील मुरगुड विद्यालयात विज्ञान दिनानिमित्त विविध उपक्रम

0

 

मुरगुड प्रतिनिधी
मुलांनी चौकसपणे जिज्ञासेतून विचारलेल्या प्रश्नांना शिक्षक पालकांनी संयम आणि आदराने दिलेली समाधानकारक उत्तरे त्यांच्या शोधकवृत्तीच्या दिशा निश्चित करतात.विज्ञान ही अभ्यासाबरोबर चिंतन आणि जीवन जगण्याचे माध्यम आहे.नागरिकांचे विज्ञाननिष्ठ जगणं समाज व देश प्रगत करतात असे प्रतिपादन शि प्र मंडळ संचलित मुरगुड विद्यालय ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य एस आर पाटील यांनी केले.

प्रशालेत राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.स्वागत व प्रास्ताविक सौ ए.एम. कोळी यांनी केले. यावेळी ‘प्रश्न तुमचे उत्तर आमचे’ उपक्रम सम्पन्न झाला. यावेळी प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना विज्ञान शिक्षक एन एन गुरव, सौ कोळी, सौ व्ही एस सूर्यवंशी,सौ.एस.जे.गावडे, सौ.एन.एम. पाटील,भीमराव गुरव,समीर कटके यांनी उत्तरे दिली.इयत्ता पाचवी सहावीच्या मुलींनी विविध विज्ञान गीते सादर केली.यावेळी पर्यवेक्षिका सौ एस वाय बेलेकर यांचेक्स मनोगत झाले.कु साक्षी विजय सापळे या विद्यार्थिनीने सर सी.व्ही.रमण यांच्या जीवन चरित्राविषयी आपले मनोगत व्यक्त केले.विज्ञान प्रश्न मंजुषा स्पर्धेत विचार वेधक व माहितीपुरक प्रश्न पाठवणाऱ्या विदयार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.यामध्ये वेदिका राहुल वंडकर, समर्थ कुंभार,ऐश्वर्या आनंदा गुरव,सिद्धी बाजीराव देवळे,जगदीश श्रीकांत बेलेकर,प्रतीक राजेश खराडे यांनी विचारलेली प्रश्न बक्षीसपात्र ठरली.

खुली विज्ञान विषयक विचारप्रवर्तक कोडी स्पर्धा घेण्यात आली. सव्वातास चाललेल्या या मनोरंजक खेळात पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांनी अचूक उत्तरे देत बक्षिसे मिळवली. सूत्रसंचालन सौ विद्या सूर्यवंशी तर आभार भीमराव गुरव यांनी मानले.यावेळी उपप्राचार्य एस पी पाटील, एस बी सूर्यवंशी,आर जी पाटील,एस एस कलंत्रे, सौ बी वाय मुसाई,सौ जी व्ही पाटील, सौ के एस पाटील, सौ एस आर भोई,एस पी खोत,पी बी मोगणे, प्रवीण शिगावकर,एस डी कुंभार, आर एन गावडे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here