दिनेश रॉय यांना नॅशनल नॉबेलिटी अवार्ड

0

पालघर – योगेश चांदेकर

पालघर-डहाणू तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात महत्वाचे योगदान देणारे सामाजिक कार्यकर्ते दिनेश रॉय यांना परीस स्पर्श फाउंडेशनचा नॅशनल नॉबेलिटी अवार्ड हा प्रतिस्थेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र व दिल्ली राज्यातील नामवंत सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये गौरविण्यात आलेल्यापैकी पालघर जिल्ह्यातील ते एकमेव पुरस्कार प्राप्ती ठरले.

रॉय यांनी डहाणूच्या शिक्षण क्षेत्रात भरीव कार्य केले असून त्यांनी आतापर्यंत ३ आदिवासी आश्रमशाळांना आय एस ओ मानांकन मिळवून देण्यात सिंहाचा वाटा आहे. एक कॉलेज आणि दोन अंगणवाडी संकुलाचे देखील आय एस ओ नामांकन त्यांनी केले आहे. शेकडो जि प शाळांना शैक्षणिक साहित्य, संगणक प्रणाली, इ लर्निंग सुविधा, गणवेश, शुद्ध पेयजल सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

स्पर्श फाउंडेशनचे प्रमुख सिने अभिनेते विजय पाटकर, अध्यक्ष अनिल येवले,पालघर जिल्हा शिक्षक सेना संपर्क प्रमुख जयदीप पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुरेश जोशी, गोदावरी परुळेकर कॉलेज ट्रस्टचे लहानु कोम, प्राचार्य बी. राजपूत, आदींच्या उपस्थितीत त्यांना गौरविण्यात आले. याबद्दल रॉय यांचे अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here