राष्‍ट्रीय पात्रता परीक्षा आता ३०० गुणांची

राष्‍ट्रीय पात्रता परीक्षा (युजीसी नेट) आता ३०० गुणांची (१५० प्रश्‍न) असणार आहे.

0

नवी दिल्ली :- केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाकडून (सीबीएसई) सहाय्‍यक प्राध्यापक पदासाठी घेतली जाणारी राष्‍ट्रीय पात्रता परीक्षा (युजीसी नेट) आता ३०० गुणांची (१५० प्रश्‍न) असणार आहे. याबाबतचे परीपत्रक ‘सीबीएसई’ने जारी केले असून, नव्या नियमांनुसास ८ जुलै २०१८ रोजी परीक्षा होणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा http://cbsenet.nic.in या वेबसाईटवर एक फेब्रुवारीला होणार आहे.
पूर्वी असणार्‍या तीन पेपर ऐवजी आता दोनच पेपर असणार असून पहिला पेपर ५० प्रश्‍न व दुसरा पेपर १०० प्रश्‍न प्रत्येकी २ गुण, असे एकूण ३०० गुणांची परीक्षा होणार आहे. परीक्षेच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. १०० गुणांच्या (५० प्रश्‍न) पहिल्या पेपरसाठी १ तासाचा अवधी असणार आहे. तर, दुसर्‍या २०० गुणांच्या (१०० प्रश्‍न) पेपरसाठी दोनच तास वेळ असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here