नाशिकच्या महिलेला चौवळं…

0

नाशिकच्या एका महिलेनं चक्क चार मुलांना जन्म दिल्याची घटना मुंबईच्या जेजे रुग्णालयात घडलीय.या चार मुलांमध्ये तीन मुली आणि एक मुलगा आहे. ही प्रसुती ऑगस्ट महिन्यामध्ये झालीय.
नाशिकची जहानरा शेख हिची सहाव्या महिन्यामध्ये सोनोग्राफपी करण्यात आली.त्यावेळी तिच्या गर्भामध्ये चार गर्भ असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. मात्र आईच्या जीवाला धोका असल्याचं डॉक्टरांनी सांगितल्यामुळे तिचे पती नाझीम शेख हे तिला जून महिन्यामध्ये मुंबईच्या जेजे रुग्णालयात घेवून आले. तिच्यावर जूनपासून उपचार सुरु होते. ऑगस्टमध्ये सिझेरियन करुन प्रसुती करण्यात आली.प्रसूतीनंतर तब्बल एक महिना रुग्णालयात राहिल्यानंतर रविवारी जहानराला घरी पाठवण्यात आलं.
जेजेच्या डॉ.लुईस सांगतात की, “देशात सात लाख गरोदर महिलांमध्ये एका महिलेच्या गर्भात एकामध्ये अधिक बाळं असतात. पण यामुळे घाबरून न जाता योग्य पद्धतीने उपचार केल्यास कोणाच्याही जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता फार कमी असते.
रुग्णालयातून घरी सोडताना जहानराच्या मुलाचं वजन २ किलो ग्रॅम, पहिल्या मुलीचं वजन १.९ किलो, दुसरी मुलगी १.८ किलो आणि तिसऱ्या मुलीचं वजन सुद्धा १.८ किलो होतं. अशा प्रकारे चार मुलं होण्याची ही घटना फार दुर्मिळ मानली जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here