सत्ता गेली म्हणून घरी बसून चालणार नाही 

नारायण राणे यांच्या काँगेस नेत्यांना घरचा आहेर

0

 

मुंबई, – सत्ता गेली तरी घरी बसून चालणार नाही. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा आदर्श घ्यायला हवा असा घरचा आहेर काँग्रेसचे आमदार यांनी काँग्रेस नेत्यांना दिला.

विधान परिषदेत दिवंगत इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्ताने त्यांच्या गौरव कार्याच्या प्रस्तावावर  बोलताना नारायण राणे यांनी इंदिरा गांधी यांचे खंबीर नेतृत्व  देश कधी ही विसरू शकणार नाही. परंतु १९७७ मध्ये काँगेस चा पराभव झाला त्यावेळी इंदिराजी यांना नागपूर येथे पत्रकारानी प्रश्न विचारला की काँग्रेस पक्ष एवढा मोठा पक्ष असताना पराभव कसा झाला ? यावर इंदिरा गांधी म्हणाल्या होती की, हार झाली म्हणून काय झाले पुन्हा जिंकणार आहे. घरी बसून राहणार नाही. इंदिराजी यांनी त्याकाळी दिलेले उत्तर आता काँग्रेस नेत्यानी लक्षात ठेवण्यासारखे आहे. असा घरचा आहेर राणे यांनी सध्या सत्तेत नसलेल्या काँग्रेस जनाना  दिला.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३२० व्या जयंतीनिमित्त इंदिराजी रायगडावर आल्या होत्या त्यावेळी योगायोगाने तेथे इंदिराजीना जवळून पाहण्याचा योग आला होता. त्यावेळी इंदिराजी महाराजासमोर उभे राहून सॅल्युट मारला ते पाहून त्यांच्या करारी व्यक्तीमत्वाची झलक पाहायला मिळाली होती हा प्रसंग  राणे यानी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here