नारायण राणे यांचा ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’

0

काँग्रेसमधून बाहेर पडलेले जेष्ठ नेते नारायण राणे यांनी आज मुंबईत नव्या राजकीय ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ची घोषणा केली. महाराष्ट्र राज्याचे, राज्यातील सर्व जनतेचा गतिमान विकास होण्यासाठी आणि विकासाच्या कामांना नेहमी पाठिंबा देणे, घटनेच्या अधीन राहून सर्वतोपरी प्रयत्न करणे हेच “महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष” करेल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मुंबईत पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी पक्षाची घोषणा केली, नव्या पक्षाचा झेंडा व चिन्ह लवकरच जाहीर करू करणार असून ‘देऊ शब्द तो पुरा करू’ हे यापक्षाचे ब्रिद वाक्य आहे. महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास हा पक्षाचा मुख्य उद्देश असल्याची घोषणा यावेळी नारायण राणे यांनी केली.
यावेळी राणे म्हणाले.. उद्धव ठाकरेंना चांगलं काही दिसत नाही, टीका करुन प्रश्न सुटत नाही, उपाय सांगितले पाहिजेत, राज ठाकरेंच्या धमक्या पोकळ, त्यांनी काय विधायक काम केले? काँग्रेसमध्ये अशोक चव्हाण आणि शिवसेनेत उद्धव ठाकरे सोडून सर्वजण त्यांचे मित्र आहेत.

राणेंनी नव्या पक्षाची घोषणा केल्यानंतर कणकवलीमध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here