औरंगाबादच्या महापौरपदी शिवसेनेचे नंदकुमार घोडेले

0

राजू म्हस्के

औरंगाबाद महानगरपालीकेच्या महापौरपदी शिवसेनेचे नंदकुमार घोडेले हे ७७ मते घेवून विजयी झाले. यात एमआयएमचे अब्दुल नाईकवाडी यांना २५ मते मिळाली तर काँग़ेसचे अय्युब खान यांना ११ मते पडली. ११३ नगरसेवकांनी मतदानाचा हक्क बजावला. शहराचे २२ वे महापौर म्हणून नंदकुमार घोडेले हे विजयी झाले. सभाग़हात शिवसेना-भाजप युतीचे ५१ सदस्य असून अपक्ष २० नगरसेवकांचा पाठिंबा मिळाला. यात सेनेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनीही पाठिंबा दर्शवला हे विशेष.
उपमहापौर पदी भाजपचे विजय औताडे हे विजयी झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here