`सृजन’ कार्यक्रमांतर्गत नागपूर व पुणे रेल्वे स्थानकाची निवड

0

नवी दिल्ली – सर्वांच्या सहकार्यांतून रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास अर्थात ‘सृजन’ या रेल्वे मंत्रालयाच्या अभिनव उपक्रमांतर्गत नागपूर रेल्वे स्थानकासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा आराखडा तर एकात्मिक व्यवस्थापन व्यवस्था निर्माण करण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकाची निवड करण्यात आली आहे.

रेल्वे मंत्रालयाच्या भारतीय रेल्वे स्थानक विकास महामंडळ लिमिटेडच्यावतीने २६ जानेवारी २०१८ रोजी देशातील ६३५ महत्वाच्या रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी सृजन हा कार्यक्रम MyGov पोर्टलवर सुरु करण्यात आला. भागधारक, रेल्वे प्रवासी, शहर नियोजनकर्ते, वास्तुविशारद, अभियंते यांच्या सहभागातून हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

सृजन कार्यक्रमांतर्गत नागपूर रेल्वे स्थानकासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा आरखडा तयार करण्याकरिता आयोजित स्पर्धेचा पहिला टप्पा नुकताच पार पडला आहे. नागपूर सह ग्वालीयर आणि बयप्पनहल्ली या रेल्वे स्थानकांचा यात समावेश आहे. या स्पर्धेचा दुसरा टप्पा ३१ मार्च २०१८ पर्यंत पूर्ण होणार आहे.

देशातील ५ रेल्वे स्थानकांसाठी एकात्मिक व्यवस्थापन कार्यक्रम हाती घेण्यात आला असून पुणे रेल्वे स्थानकाचा यात समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here