स्वातंत्र्योत्तर भारतातील कागलचे पहिले आमदार संस्कृत-इंग्रजी साहित्याचे व्यासंगी आणि बहुजनांच्या शिक्षणाचे पुरस्कर्ते

0

By Correspondent : Newstale

Murgud

  • संस्कृत इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व, व्यासंग,बहुजन समाजाच्या दुःखाशी समरस होण्याची संवेदनशीलता, लोकसंचय आणि प्रशासन चालवण्याचा वकुब या गुणांमुळे प्राचार्य एम आर साहेब एक अष्टपैलू व्यक्तित्व म्हणून महाराष्ट्राला परिचित झाले.त्यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान कोल्हापूर आणि सीमाभागातील बहुजन समाज कधीही विसरू शकत नाही.शिक्षण हेच बहुजनांच्या सर्व समस्यांवरील उपाय हे ओळखून त्यांनी केलेले कार्य राज्याच्या शिक्षण व्यवस्थेला दिशादर्शक ठरते असे उदगार शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित मुरगुड विद्यालय ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य एस.आर.पाटील यांनी काढले.प्रशालेत कागलचे पहिले आमदार स्व.प्राचार्य एम.आर.देसाई यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित इंग्लिश डे समारंभात ते बोलत होते.स्व.एम.आर.देसाई यांच्या प्रतिमेस अभिवादन व दिपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.इंग्रजी अध्यापिका सौ.बी.वाय.मुसाई यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन कु.साक्षी विजय सापळे हिने केले.कार्यक्रमास उपमुख्याध्यापक जे.डी.पाटील,उपप्राचार्य एस.पी.पाटील,तंत्रविभाग प्रमुख पी.बी. लोकरे, एस.बी.सूर्यवंशी,एस.बी.बोरवडेकर,वाय.इ.देशमुख,प्रा पी.एस.पाटील,एस.व्ही. म्हेतर,व्ही.आर.गडकरी,महादेव कांबळे,ए.एच.भोई,समीर कटके,एम.बी.टेपुगडे,ए.एन.पाटील,एस. पी.खोत,विजय पाटील,सुखदेव लोकरे,एन.एन.गुरव,एस.डी.कुंभार,भीमराव गुरव,आर.एन.गावडे,प्रशांत डेळेेकर,मजहर जमादार,सोपान खराडे,सुनील गवळी,चंदू रनवरे,दयानंद कांबळे,आप्पा नाईक,पिंटू बोंडगे,जोतिराम खराडे,संपत कोळी उपस्थित होते.

इंग्रजी हस्ताक्षर स्पर्धेतील विजेते

इयत्ता 5 वी ते सातवी
समृद्धी भीमराव मेटील
यश अमित भोई
सुधर्म ओंकार माळी
सुमित दयानंद आरेकर

इयत्ता 8 वी
सुहानी सुनील पाटील
सानिका राजेंद्र एकल
वैष्णवी धनंजय सूर्यवंशी पाटील
सोहन विजय देवळे

इयत्ता 9 वी
श्रुती राजेंद्र महाजन
प्रतीक रमेश परीट
ऋतुजा शशिकांत मेंडके
आदित्य पांडुरंग लोकरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here