विवाहित प्रियसीची गळा घोटून हत्या काळाचौकी येथील घटना

0

एका प्रियकराने त्याच्या विवाहित प्रियेसीचा ओढणीने गळा घोटून हत्या केल्याची खळबळजनक घटना आज दुपारी काळाचौकी येथील राजदूत हॉटेलमध्ये घडली, यातील शहनाज शेख (२८) असे मृत महिलेचे नाव असून काळाचौकी पोलिसांनी आरोपी इरशाद अहमद कुरेशी (२३) याला अटक केली आहे. शहनाज व इरशाद यांचा कपड्याचा व्यवसाय होता मात्र शहनाज इरशाद याला नफ्याचे कोणतेही पैसे देत नव्हती यावरून दोघात भांडण सुरु असायचे. आज सकाळी दोघे राजदूत हॉटेल मध्ये आले होते, त्यांनी हॉटेलच्या सातव्या मजल्यावरील ११० क्रमांकाचा रुम बुक केला. तेथेही पैशांवरून दोघांमध्ये भांडण झाले, यातूनच संतापाच्या भरात शहनाजला ठार मारले, असे इरशाद याने काबुल केले हि माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप उगले यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here