एम आर प्रशालेत नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती उत्साहात साजरी

0

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : येथील एम आर प्रशालेत भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे प्रवर्तक नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्राचार्य श्री एस. एस नाईक यांच्या हस्ते प्रतिमापुजन करण्यात आले. पृथ्वीच्या पाठीवर संपुर्ण विश्वात या भारतभूमीला नवरत्नांची खाण समजले जाते. या खाणीत अनेक शूररत्नांनी जन्म घेऊन या भारताला बिर्टीश शृंखलेच्या जाळ्यातून मुक्त करण्यासाठी अनेक महान नेत्यांनी प्राणाचे बलिदान दिले. या महान नेत्यांमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव अग्रटोकावर आहे. कॉलेज जीवनातच त्यांनी नेतृत्वाचे शिखर सर करून त्यांना अन्याय व अवमान या दोन्ही गोष्टींची चीड होती. त्यांनी सनदी अधिकारी या पदाचा त्याग करून मी. गांधींच्या आव्हानाला प्रतिसाद देवून सुभाषचंद्र बोस यांनी स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली. देशप्रेम, त्याग, ध्येय निष्ठा धडाडी यांच्या तून असंख्य भारतीयांची मने राष्ट्रभक्तीने पेटलेल्या नेताजी विषयी ‘तु फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर तु तोडल्यास गुलामाच्या पायातल्या बेड्या’ असे उदगार प्रा सुषमा पाटील यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी माजी प्राचार्य एम बी कुंभार, शेख एस एस पेडणेकर एस एस श्री. आर वाय नाईक, के वाय पाटील प्रा. ए ए मगर, प्रा बी टी यादव प्रा एच एम काटकर प्रा एस वाय कुंभार प्रा व्ही ए पाटील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here