छातीवर बसून आता चितपट करणार :खासदार धनंजय महाडिक

0

छातीवर बसून आता चितपट करणार :खासदार धनंजय महाडिक
मुरगूड प्रतिनिधी
संसदरत्न वाशिल्याने मिळत नाही त्यासाठी कष्ट करावे लागतात.जनतेने माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या पोराला 2014 निवडणुकीत मोदी लाट असताना निवडून दिले याची जाणीव ठेवून खासदारकीची जबाबदारी पेलली.त्यावेळची कुस्ती काठावर जिंकली होती आता छातीवर बसून चितपट करण्यासाठी सर्वांनी ताकद द्यावी असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले.
मुरगुड ता.कागल येथे गोकुळचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक रणजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लाल आखाडा व्यायाम मंडळाने आयोजित केलेल्या सत्कार समारंभात ते बोलत होते. जेष्ठ संचालक अरुण नरके अध्यक्षस्थानी होते.
खा महाडिक म्हणाले खासदाराने संसदेत कायदे बनवण्यासाठी योगदान द्यायचे असते त्या कार्यात अहोरात्र कष्ट उपसून सहभाग घेतला जनतेचे ग्रामीण, शहरी, औद्योगिक प्रश्न अभ्यासपूर्ण पद्धतीने .त्या कार्यातून दिल्ली दरबारी कोल्हापूरचे नाव उंचावले. या कार्यात राष्ट्रीय नेते शरद पवार यांचा आशीर्वाद आणि सुप्रियाताईची साथ असल्यामुळे आगामी कुस्ती मैदान मारण्यासाठी सज्ज आहे. सलग तीन वर्षे संसदरत्न पुरस्कार जिंकून हॅटट्रीक केली आहे.कोकण रेल्वे,बीएसएनएल, शिक्षण बिल, स्पोर्ट्स बिल, कोल्हापूरचे बास्केट ब्रीज,पासपोर्ट कार्यालय,कोल्हापूर सातारा रोड असे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी व संसदेत कायदे करण्यात मोलाची भूमिका घेतली. मागील निवडणुकीत काठावर जिंकलो यावेळी छातीवर बसून कुस्ती चितपट करून दाखवणार आहे.
रणजितसिंह पाटील यांचा नागरी सत्कार धनंजय महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला. सत्कारास उत्तर देताना रणजितसिंह पाटील म्हणाले,” आज मी जो उभा आहे त्याचे श्रेय महादेवराव महाडिक व अरुण नरके यांना आहे. गोकुळने माझे आयुष्य घडवले.लोकसभा निवडणुकीत आमच्या शुभेच्छा आणि ताकद खास महाडिक यांच्या मागे उभी करू त्याबाबत कोणतीही शंका कुशंका ठेवू नका.पण तालुक्याच्या राजकारणात काय करायचं त्याचा निर्णय नंतर घेऊ ते मात्र आमच्यावर सोपवा” असेही ते म्हणाले. यावेळी अरुण नरके, हिंदकेसरी यांचेही मनोगत झाले.
सोहळ्यास बाबासाहेब पाटील, विश्वासराव जाधव,धैर्यशील देसाई, बाळासाहेब खाडे,अमरसिंह घोरपडे, विठ्ठलराव खोराटे,विलास कांबळे,दत्तामामा खराडे, सुनील सूर्यवंशी,अनंत फर्नांडिस,देवराज बारदेस्कर,विश्वजित पाटील,पदमसिंह पाटील उपस्थित होते.
स्वागत दगडू शेणवी प्रास्ताविक संतोष वंडकर यांनी केले.आभार भरत लाड यांनी मानले.

साठीतली समाजिक बांधिलकी ….
आपल्या भाषणात रणजितसिंह पाटील म्हणाले” मुरगुडमध्ये आंतराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती संकुल केल्याशिवाय फेटा बांधणार नाही त्यासाठी सहकार्यासाठी झोळी घेऊन फिरेन तुमचे सहकार्य हवे.यावर बोलताना खास महाडिक म्हणाले साठीत संपन्न स्थितीत असणारे लोक परदेश वाऱ्या करतात पण रणजितदादानी क्रीडा क्षेत्राला उभारी देण्यासाठी सोडलेला संकल्प वाखाणण्यासारखा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here