मोदींची अवस्था ‘ गजनी’ सारखी धनंजय मुंडे यांची टीका

आज देशात आणि राज्यात आदिवासीना वनवासी समजणाऱ्याची सत्ता : छगन भुजबळ

0

 

विक्रमगड मध्ये राष्ट्रवादीची निर्धार सभा

पालघर-योगेश चांदेकर :

पालघर-जमीन विकुन आलेला पैसा पावडर खावून बनवलेली बॉडी आणि मोदी लाटेत निवडुन आलेले आमदार खासदार टीकत नाही या लाटेने राज्याचे काय वाटोळे झाले हे अनुभवत असून आज २०१४ च्या निवडणूकीतील मोदीनी केलेली भाषणे आणि आजची त्यांची भाषणे एकल्यानंतर गजनी पिचरची आठवण येते यांनी दिलेली आश्वासनेच हे विसरले यामुळे नरेंद्र मोदींची अवस्था गजनी सारखी झाल्याची टीका विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली विक्रमगड येथे आयोजित निर्धार परीवर्तनाचा या सभेत ते बोलत होते.
मुंडे पुढे म्हणाले कि जीवनावश्यक वस्तुंचे भाव एवढे वाढलेत कि हिशोब केला तर रात्रभर झोप येणार नाही. यामुळे अछे दिन आहेत का असे विचारल तर सत्ताधारी आमदार खासदारही हात जोडुन हसतात अशी परीस्थिती असून मोदीनी नागपूरात सांगितले कि मै चौकिदार हु मै सोता नही हु मात्र खरे चोर व्यासपीठावरच होते अशी खिल्लीही मुंडे यांनी उडवली उलट परदेशात पळालेले मल्ल्या निरव आणि चौक्षी पोटधरुन हसत असतील अशी पुष्टीही जोडली तर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक प्रश्नाना हात घालत विमानसेवा शेकडो रेल्वे असताना अहमदाबाद मुंबई बुलेटट्रेन कशाला हवी असा सवाल केला त्याएवजी ईथल्या लोकांना सेवा द्या फक्त ईथल्या कुपोषणावर खर्च करायला हवा असे सांगितले तर फक्त पुतळ्यावर खर्च करणारे हे सरकार शेतकरी कामगारांकडे मात्र दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप पवार यांनी केला.
यावेळी जेष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या खास शैलीत सत्ताधाऱ्यांची खिल्ली उडवड शेरोशायरीने उपस्थितांची दाद मिळवीली भुजबळ म्हणाले कि या सरकारकडे सहनकरण्याची ताकद नसून ईथली मिडीया साहित्यिक आणि विरोधीपक्षाला दादागीरी करून गळचेपी करत आहेतमात्र दादागिरी करण्यांचे दिवस लवकर संपतात हे यांनी लक्षात घ्यायला हवे मी बोललो तर मलाही जेल मध्ये टाकले कारण १०० कोटींच्या महाराष्ट्र सदनात यांचा आरोप ८०० कोटींच्या घोटाळ्याचा आहे यांना सांगु ईच्छितो की ५ फुटाच्या म्हशीला १५फुटाचे रेडकु कसे होईल असा सवाल भुजबळानी केला.तर हे सरकार आदिवासीच्या विरोधातले असून अजूनही आदिवासीनी वनवासी सांगणारी ही माणसे असून यांना आदिवासी आदीपासुन वास करणारे असुन आम्ही वनवासी नसुन आदिवासी आहोत हे सांगण्याची वेळ आता आली असल्याचे भुजबळानी सांगितले यासभेची प्रस्तावना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनिल भुसारा यांनी केली.
यावेळी शेकडो कार्यकर्त्यानी राष्ट्रवादीत प्रवेश केला सभेला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,आमदार आनंद ठाकूर पांडुरंग बरोरा महीला प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील ओबीसी प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुदे तसेच जिल्हा तालुका पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here