‘मोदीजी समजावून सांगण्याचे कष्ट घ्याल का ? राहुल गांधीं

0

नवी दिल्ली – डोकलामवरुन राहुल गांधींनी नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. चीनने पुन्हा एकदा डोकलामध्ये रस्ते निर्माण कार्य सुरु केले असल्याच्या बातम्या येत आहेत. राहुल गांधींनी ट्विट करुन म्हटले, ‘मोदीजी, तुम्ही छाती ठोकणे बंद केले तर हे समजावून सांगण्याचे कष्ट घ्याल का? चीनने डोकलाम परिसरात पुन्हा रस्ते निर्माण सुरु केले, आधीच्या वादग्रस्त जागेपासून अवघ्या 12 किलोमीटरवर हे काम सुरु आहे.’ भारतीय अधिकाऱ्यांचा दावा आहे की चीन त्यांच्या रस्त्यांचे रुंदीकरण करत आहे. रस्ते रुंदीकरणाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 500 जवान तैनात करण्यात आले आहेत.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here