‘मौनी’च्या प्राचार्यपदाबाबत सकल मराठा समाजाचे संचालकांना निवेदन

0

गारगोटी (प्रतिनिधी) :

मौनी विद्यापिठ गारगोटीच्या संयुक्त प्रशिक्षण केंद्र गारगोटी येथील केंद्राकडे प्राचार्य पद हे खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असताना यापदावर पात्र मराठा समाजातील उमेदवाराला डावलून इतर समाजातील उमेदवाराला संधी दिली आहे. यामुळे मराठा समाजातील उमेदवारांवर अन्याय झाला आहे. याबाबत वारंवार मौनी विद्यापीठाच्या संचालकांना निवेदन दिली आहेत. तरी त्यांनी काही कारवाई केली नाही. तसेच विद्यापीठचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील, चेअरमन आशिष कोरगावकर यांना या निवेदन विषयी माहिती संचालकांनी दिली नाही.

यामुळे सकल मराठा समाजाच्या वतीने मौनी विद्यापीठ संचालक प्रा.बेलेकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी १२ मार्चपर्यत या पदावर मराठा समाजातील उमेदवाराची निवड करावी अन्यथा बुधवार (दि. १३) पासुन गारगोटी तहसील कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आले. यावेळी मौनी विद्यापिठ शासकीय प्रतिनिधी अलकेश कांदळकर, संचालक मधुकर देसाई, मौनी विद्यापिठ कर्मचारी प्रतिनिधी खोत उपस्थित होते. निवेदनावर भुदरगड सकल मराठा समाजाचे अध्यक्ष नंदकुमार शिंदे, प्रहार संघटनेचे अध्यक्ष मच्छिद्र मुगडे, भाजप शहर अध्यक्ष राहुल चौगले, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष शरद मोरे, मराठा महासंघाचे अध्यक्ष संग्राम पोफळे, शिवसेना तालुका प्रमुख अविनाश शिंदे, सामाजिक कार्यकर्ते शशिकांत पाटील, तुकाराम देसाई, प्रताप चौगले, भीमराव गुंड, गणेश सुतार आदींच्या सह्या आहेत. निवेदनाच्या प्रति तहसील भुदरगड पोलीस स्टेशन, प्रांताधिकारी भुदरगड यांना देण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here