प्रांतधिकाऱ्यांची खुर्ची पळवण्याचा प्रयत्न पोलीसांचा हस्तक्षेप ; महागाईविरोधात मनसेची इचलकरंजीत निदर्शने

0

इचलकरंजी : महागाईने कहर केला असून जनसामान्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. याच्या निषेधार्थ शुक्रवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रांताधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.
सर्वसामान्यांचे जिव्हाळयाचे प्रश्न असताना प्रांताधिकारी अनुपस्थित राहिल्यामुळे संतप्त झालेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी प्रांताधिकाऱ्यांची खुर्ची कार्यालयाबाहेर काढण्याचा प्रयन्त केला. यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता. यावेळी पोलीसांनी तातडीने हस्तक्षेप केला.
मनसे कार्यालयापासून मोर्चास प्रारंभ झाला. घंटानाद करीत व सरकारविरोधात घोषणा देत कार्यकर्ते प्रांत कार्यालयावर धडकले. त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन करून शासनाच्या अपयशाचा पंचनामा करण्यात आला.
दरम्यान, प्रांताधिकारी गैरहजर राहिल्याने काही कार्यकर्त्यांनी थेट प्रांत कार्यालयात घुसून प्रांताधिकाऱ्यांची खुर्ची कार्यालयाबाहेर काढण्याचा प्रयन्त केला. यावेळी कार्यकर्ते आणि पोलीसांमध्ये वादावादी झाली. आंदोलनात शहराध्यक्ष राजेंद्र निकम, प्रताप पाटील, रवी गोंदकर, मनोहर जोशी, शहाजी भोसले, मोहन मालणकर, नितीन कटके, सिंधु ताई शिंदे आदींनी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here