आमदारकीचा वापर फक्त लोकसेवेसाठी: आम. प्रकाश आबिटकर

0

या वार्ताहर धामोड :
माझ्यासारखा कार्यकर्त्याला जनतेचे मानाचे आमदारकीचे पद बहाल केले. या पदाचा वापर लोकसेवेसाठीच करून दुर्गम, डोंगराळ कोते, चांदे, गोतेवाडी, पाल या गावांचा विकास जलदगतीने होण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली.
गातेवाडी व कोते (ता. राधानगरी) येथे विविध विकास कामाचा शुभारंभ व पूर्ण झालेल्या कामांच्या उद्घटप्रसंगी ते बोलत होते.
स्वागत व प्रास्ताविक संतोष गोते यांनी केले. कोते-गोतेवाडी-पाल रस्त्यासाठी ३ कोटी ५४ लाख रुपये, कोते अंतर्गत रस्ता १० लाख, कोते सांस्कृतिक सभागृह ७ लाख, गोतेवाडी अंतर्गत रस्ता ५ लाख, मानेवाडी अंतर्गत रस्ता ५ लाख असा जवळपास ३ कोटी ८१ लाख रुपयांचा निधी या गावासाठी दिला आहे. यापुढेही विकासास कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गावासाठी निधी दिल्याबद्दल आमदार आबिटकर यांचा कोते, गोतेवाडी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी पंचायत समिती सदस्य उत्तम पाटील, सागर धुंदरे, धनाजी खोत, कल्याणराव निकम, कोतेच्या सरपंच अनिता सचिन पाटील, उपसरपंच धोंडीराम तेलवी, महाडिक युवाशक्ती अध्यक्ष सचिन पाटील, माजी सरपंच दिलीप गुरव, राजेंद्र कोतेकर, विलास पाटील, भिकाजी गोते, कशीनाथ पाटील, राजेंद्र देसाई, धनाजी मरळकर, सर्जेराव गोते, शामराव सांगावकर, तानाजी गोते, प्रकाश गोते, डॉ. शामराव गोते, अनिल गोते, नामदेव गोते, सुरेश मरळकर, बळवंत गोते, सागर गोते, राजाराम मरळकर, आबाजी कांबळे होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here