आमदार कुपेकरांनी मुख्यमंत्र्यांबरोबर घडवली प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांची भेट

0

प्रतिनिधी चंदगड :
चंदगडच्या आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांची भेट घडवून विविध मागण्याचे निवेदन प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांना दिल्याने अपंग बांधवातून समाधान व्यक्त होत आहे.
राज्यातील अंध, अपंग, मतिमंद, मूकबधिर तसेच विधवा, परितक्ता, भूमिहीन व दुर्दर रोगी याच्या विविध मागण्यासाठी आमदार संध्यादेवी कुपेकर, डॉ. नंदिनी बाभुळकर यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घडवून आणली. शारीरिक व मानसिक दृष्ट्या अपंगत्व असलेल्या तसेच विधवा महिला परितक्त्या भूमिहीन, जर्जर रोगाने बाधित अशा बांधवांच्या विविध मागण्यांसाठी गेल्या १० डिसेंबर २०१८ पासून एक महिना बेमुदत सत्याग्रही आंदोलन सुरु होते. त्यावेळी सनदशीर मार्गाने विविध मागण्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत प्रत्यक्ष भेट घेऊन सांगण्यासाठी शासनामार्फत भेट घडवून द्यावी, अशी मागणी लावून धरली होती. मुख्यमंत्री भेटीची शक्यता धूसर होत आहे कि काय, अशी चर्चा होती. चंदगड तालुक्याच्या आमदार संध्यादेवी कुपेकर, डॉ. नंदिनी बाभुळकर यांनी पुढाकार घेवून अपंग प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्याची भारत घडवून अपंगाच्या समस्या मांडल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ अपंगांचा प्रश्न धावून घेऊन जिल्हाधिकारी पासून ते ग्रामपंचायत स्तरापर्यंत आदेश दिल्याने अपंगातून उत्साहाचे वातावरण पसरले आहे. यावेळी आमदार संध्यादेवी कुपेकर, प्रहारचे अध्यक्ष जोतिबा गोरल, लक्ष्मण बेनके, विठ्ठल वांद्रे, सामाजिक कार्यकर्ते आनंदराव कांबळे, राजू कापसे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here