‘आमदार क्षीरसागर मंत्रिमंडळात असतील’

0

 

कोल्हापूर : गेल्या काही वर्षांपासून पालकमंत्री चंद्रकांत पाटील त्यांचे कार्यकर्ते व आमदार राजेश क्षीरसागर यांच्यामध्ये अनेकदा आरोप-प्रत्यारोप झाले. मात्र रविवारी गृहिणी महोत्सवाच्या समारोप समारंभात पालकमंत्री पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमात गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी, ‘पालकमंत्री पाटील व आमदार क्षीरसागर एकत्र असल्याने आमदार विजयाची हॅटट्रिक करून मंत्रिमंडळात स्थान मिळवतील’ असा विश्वास व्यक्त केला. काही दिवसांपूर्वीच भाजपने उत्तर मतदारसंघावर दावा केला असताना मंत्री केसरकर यांनी केलेल्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावरील भगिनी महोत्सवात मंत्री केसरकर म्हणाले, ‘महोत्सवाच्या निमित्ताने आमदारांनी महिलांनी तयार केलेल्या वस्तुंच्या विक्रीसाठी चांगले व्यासपीठ मिळवून दिले आहे. पाणीप्रश्न, टोल याचबरोबर समाजकंटकांनी नागरिकांवर केलेला हल्ला त्यांनी परतवून लावला. रिक्षांना ई-मीटर वाटप असो किंवा महापुरुषांच्या पुतळा सुशोभीकरणाची कामे. ती आमदार पाटील यांनी हाती घेतली. आता पालकमंत्री पाटील व आमदार एकत्र असल्याने त्यांच्या विजयाची हॅटट्रिक पूर्ण होऊन त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल.’

संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर म्हणाले, ‘सामाजिक काम करताना कितीही टीका झाली तरी आपले काम प्रामाणिकपणे करायचे. टीकेकडे दुर्लक्ष करुन काम करत राहा.’

ऋतुराज क्षीरसागर म्हणाले, ‘गेल्या निवडणुकीपासून गायब झालेले लोक सध्या आमदारांवर टीका करीत आहेत. जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांत कोण कोणाविरोधात लढणार हे निश्चित आहे. पण उत्तर मतदारसंघात समोर उमेदवारच नाही, ही विजयाची नांदी आहे.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here