मुरगूडच्या अंबाबाई मंदिरासाठी ४८ लाखाचा निधी: आम.हसन मुश्रीफ यांची माहिती

0
  • मुरगुड प्रतिनिधी
    मुरगूड ता.कागल येथील ग्रामदैवत अंबाबाई मंदिरासाठी महाराष्ट्र शासनाकडून तब्बल ४८ लाखाचा निधी मंजूर झाला असून आतापर्यंत कोट्यवधी  रुपयांचा निधी या मंदिरासाठी खर्च झाला आहे.मंदिर पूर्णत्वासाठी आपल्या प्रयत्नातून आतापर्यंत सुमारे १ कोटी ३० लाख रुपये मंदिरासाठी दिला असून हे मंदिर पूर्ण होण्यासाठी अजून पन्नास लाखाची मागणी मुरगूडवासीयांनी केली असून त्यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन आमदार हसन मुश्रीफ प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिले आहे.

बारा वर्षांपूर्वी मुरगुडच्या अंबाबाई मंदिराच्या जिर्णोद्धाराला सुरवात झाली.मंदिराची व्याप्ती आणि भव्यता वाढत गेल्याने मंजूर निधी आणि लोकवर्गणीतून उभा केलेला निधी कमी पडू लागला पर्यायाने मंदिराचे कामास विलंब लागू लागला.या मंदिरासाठी लोकवर्गणीतुन लाखो रुपये गोळा झाले आहेत.मंदिराचे संपूर्ण काम घडीव दगडातून होत असल्याने ते आकर्षक होत आहे.

यावेळी मुश्रीफ यांनी “आपण ज्या ज्या वेळी निधी मागितला त्या त्या वेळी तो दिला आहे.मंदिर परिसरात सभागृह बांधण्यासाठी प्रादेशिक पर्यटन विकास कामांतर्गत एकूण मुरगूड साठी तब्बल ७८ लाख २७ हजार निधी मंजूर झाला होता.यातील ३० लाख निधी मिळला होता उर्वरित ४८ लाख २७ हजार निधी मिळणे प्रस्तावित होते.यासाठी आपण वेळोवेळी पर्यटन मंत्री जयकुमार रावळ यांच्याशी संपर्क साधला.या प्रयत्नातून सदरचा निधी मंजूर झाल्याचे दोन दिवसांपूर्वी पत्राद्वारे कळवले असून या निधी मुळे मंदिर पूर्णत्वास चालना मिळेल”, असे म्हटले आहे.

पन्नास लाखाच्या अतिरिक्त निधीसाठी करणार प्रयत्न…….

दरम्यान मंदिर पूर्ण होण्यास अजून पन्नास लाखाच्या निधीची मागणी नागरिकांनी मुश्रीफ यांच्याकडे सातत्याने केली आहे.त्यासाठी शासनाकडे पन्नास लाखाची मागणी प्रस्तावाद्वारे करून तो निधी मंजूर करण्यासाठी आपण युद्ध पातळीवर प्रयत्न करू असे आश्वासन मुश्रीफ यांनी दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here