कोल्हापूर : महापौर निवडणुकीत हुज्जत आणि अरेरावी करणाऱ्या डीवायएसपी सुरज गुरव यांचेवर हक्कभंग दाखल करणार असल्याची माहिती आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महापौर निवडीच्या प्रक्रियेसाठी महापालिकेच्या इमारतीमध्ये प्रवेश करण्यास सत्तारुढ कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांना ओळखपत्राची मागणी पोलिस उपअधीक्षक सुरज गुरव करत होते. मी त्यांना कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी आहे, ती पार पाडा असे सांगितले. तसेच ओळखपत्र बघण्याचे काम महापालिका अधिकाऱ्यांचे असल्याचे सांगितले. आमच्या नगरसेवकांना महापालिकेत न सोडण्याचा डाव पोलीस अधिकारी करत होते. त्याला आपण अटकाव करत होतो. मात्र गुरव यांनी हुज्जत घालायला सुरुवात केली. त्यांचा मी निषेध करत आहे. तसेच गुरव यांच्यावर मी हक्कभंग प्रस्ताव आणणार असल्याचे आमदार मुश्रीफ यांनी सांगितले .

भाजपच्या काळात चांगल्या क्रीम पोस्ट मिळवण्यासाठी असे अधिकारी चमकुगिरी, चमचेगिरी करत आहेत. चहापेक्षा किटली गरम असल्याची टीका आमदार मुश्रीफ यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here