आ. आबिटकरांच्या माध्यमातून ३ महिन्याच्या चिमुकल्याला जीवनदान

0

 

गारगोटी (प्रतिनिधी) :

भुदरगड तालुक्यातील वेंगुरूळ या गावातील एका ३ महिन्याच्या छकुल्याला राधानगरी भुदरगड आजराचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी जीवदान देऊन फक्त एकाच घराण्यात नव्हे तर अख्या भुदरगडसह तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांमध्ये त्यांच्या कर्तव्यदक्ष नेतृत्वाची पुन्हा नव्याने ओळख करून दिली.

वेंगरूळ (ता.भुदरगड) येथील विजय जगताप यांचा ३ महिन्यांच्या मुलगा कु. राजवीर हा जन्मतः हृदय विकाराशी झुंजत होता आणि त्याच्या या विकारावर होणारी शस्त्रक्रिया ही कुटुंबाच्या अवाक्याबाहेर होती. अखेर जगताप परिवाराने आमदार प्रकाश आबिटकर यांची भेट घेत या बद्दल माहिती दिली. आमदार आबिटकरांनी थोडाही विलंब न करता त्वरित मुंबई येथील नामांकित रुग्णालयात ६ लाख ५० हजाराची हृदय शस्त्रक्रिया मोफत करून दिली.

आमदार आबिटकर यांची कु. राजवीर यांच्या आई वडिलांनी भेट घेऊन आभार मानले. यावेळी आमदारांनी देखील राजवीरला हातात घेऊन न्हाहाळले. तसेच राजवीरला भेटून खरच आता समाधान वाटत अशी प्रतिक्रिया आमदार आबीटकर यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here