मालेगावात अल्पवयीन तरूणीवर बलात्कार

मालेगावात अल्पवयीन तरूणीवर बलात्कार, संविधान नगर मधील तिघांविरोधात गुन्हा दाखल, एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात

0

मालेगाव कॅम्प भागातील सोळा वर्षीय अल्पवयीन तरुणीवर याच भागातील तरुणाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आलीय. तरुणीच्या फिर्यादीवरुण वडनेर खाकुर्डी पोलिसात गुन्हा दाखल झाल असून या घटनेने  कॅम्प परीसरात खळबळ उडालीय. ही घटना सहा जानेवारी रोजी घडलीय.

यातील  तरुणाने रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पिडीतेच्या घरात कुणी नसल्याची फायदा घेत घराच्या पाठीमागील दरवाजात येवून पिडीतेकडे पिण्यासाठी पानी मागितले.  पाणी आणण्यास तरुणी घरात जाताच आरोपीसुध्दा तिच्या मागोमाग घरात गेला आणि त्याने जबरदस्तीने शाररीक संबंध केला.

याबाबत तरुणीच्या आई वडिलांनी जाब विचारताच आरोपी विशाल उर्फ़ लखन बापू पगारे त्याचे भाऊ, सागर पगारे, आबा पगारे या तिघांनी शिविगाळ करुण त्यांना मारहाण केली. या बाबत पीडीत तरुणीच्या फिर्यादीवरून प्रथम मालेगाव कॅम्प पोलिसात झिरो नंबर फिर्याद दाखल करण्यात आली असून, नंतर वडनेर खाकुर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येवून कॅम्प संविधान नगरचा रहिवासी मुख्य आरोपी लखन पगारेला बलात्काराच्या गुह्यात ताब्यात घेण्यात आले आहे. शिविगाळ, मारहाण प्रकरणात त्याच्या भावांचा पोलिस शोध घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here