मंत्री राजकुमार बडोले यांनी पदाचा राजीनामा द्यावा – ना.धनंजय मुंडे

0

स्वतःच्या मुलीला स्वतःच्या खात्याची परदेशी शिक्षणासाठीची शिष्यवृत्ती मिळवुन देऊन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी स्वतःच्या पदाचा स्वतःच्या कुटुंबियांच्या फायद्यासाठी गैरवापर केला असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांनी केला असुन, त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी ही केली आहे. 

      स्वतःच्या मुलीला स्वतःच्या खात्याची परदेशी शिक्षणाची शिष्यवृत्ती मिळवुन दिल्याबाबतची बाब उघडकीस आल्यानंतर या बाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना ना.धनंजय मुंडे म्हणाले की, सामान्य माणासांना गॅस सपसीडी सोडण्याचे आवाहन करणार्‍या भाजपा सरकारमधील मंत्री मात्र स्वतःच्या फायद्यासाठी पदाचा गैरवापर करीत आहेत. गरिब कुटुंबातील अनुसुचित जातीच्या मुला-मुलींवर हा अन्याय असल्याचे सांगतानाच सदर निवड प्रक्रिया रद्द करून नव्याने निवड प्रक्रिया राबवण्याची मागणी त्यांनी केली आहे. या शिष्यवृत्तीचा लाभ घेणार्‍या इतर अधिकार्‍यांचीही चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही श्री.मुंडे यांनी केली आहे. मुख्यमंत्री या प्रकरणाची पारदर्शक चौकशी करणार का ? का पुन्हा एकदा क्लिन चिट देत मंत्र्यांना पाठीशी घालणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here