एफआरपीबाबत गुरुवारी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक कारखानदारांचा निर्णय : एकरकमी एफआरपीसाठी ५०० रुपये अनुदान आवश्यक

0

कोल्हापूर :देशांतर्गत व आंतराष्ट्रीय पातळीवर साखरेच्या दारात नीचांकी पातळीवर घसरण झाल्यामुळे साखर उद्योगाचे गणित कोलमडले आहे. परिणामी निश्चित झालेली एफआरपीची रक्कम कारखानदारांना देणे शक्य नाही. या पाश्वभूमीवर रविवारी जिल्यातील कारखानदारांची बैठक झाली. या बैठकीदरम्यान कारखानदारांच्या प्रतिनिधींनी सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून एफआरपीचा तोडगा काढाण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्याची विनंती केली. त्यानुसार कारखानदारांची मुख्यमंत्र्यांसोबत गुरुवारी, १० रोजी मुंबई येथे बैठक होणार आहे. या बैठकीत एफआरपी देण्यासाठी प्रतिटन ५०० रुपये अनुदान देण्याची मागणी केली जाणार आहे.
एफआरपी देण्यासाठी कारखानदाराना सुमारे ५०० रुपये कमी पडतात. कमी पडणारी ही रक्कम कर्ज स्वरूपात देण्यासाठी बँकांनीही नकार दिला आहे. त्यामुळे गाळप हंगाम सुरु होऊन तब्बल दोन महिने झाले तरी ऊस उत्पादकांना एफआरपीची रक्कम मिळालेली नाही. परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली असून त्यांचे अर्थकारण बिघडले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here