गडहिंग्लजमध्ये ९ ऑगस्ट च्या सकल मराठा मोर्चाच्या नियोजनाची बैठक संपन्न …

0

मराठ्यांच्या न्याय्य हक्कासाठी भव्य अशा मराठा क्रांती मूक मोर्चामध्ये लाखोंच्या संख्येने सामील व्हा. आत्ता नाही तर कधीच नाही . अशी भावना उपस्थित सर्व मराठ्यांनी केली. 9 ऑगस्ट रोजी होणारा मराठा मोर्चा यशस्वीपणे कसा पार पाडता येईल यासाठी  गडहिंग्लज च्या शाहू सभागुहांमध्ये नियोजनाची बैठक पार पडली. याचे  संपर्क  कार्यालय पाटोळे हॉस्पिटल येथे असेल असे निश्चित केले. त्याच बरोबर सकल मराठा मोर्चा साठी जे सहभागी होणार आहेत त्यांची 300 रुपये या नाममात्र शुल्कात प्रवासाची  सोय केली जाईल असे निश्चित करण्यात आले . जादा जो खर्च होणार आहे त्यासाठी मदती चे आवाहन करण्यात आले आहे. ही मदत सकल मराठा मोर्चा चे कार्यालय येथे जमा करावी असे आवाहन सकल मराठाच्या वतीने करण्यात आले  या वेळी उपस्थितामधून मदत जाहीर करून ती शिवाजीराव भुकेले यांच्याकडे जमा करण्यात आली. रोख 20 हजार रुपये इतकी रक्कम जमा झाली .  गडहिंग्लज व आसपास च्या सर्व भागात डिजिटल लावण्याचे निश्चित करण्यात आले .या वेळी सुनील शिंत्रे ,नागेश चौगुले संतोष शिंदे पी डी पाटील , एम डी पाटील ., एस आर पाटील , डॉ पाटोळे , डॉ पी पी पाटील , डॉ माळवी प्रभात साबळे वैभव पाटील श्रद्धा शिंत्रे , डॉ खोराटे , आदी मान्यवर उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here