नवी मुंबई महापालिका महापौर पदासाठी चुरस

0

जयश्री भिसे

येत्या 9 नोव्हेंबरला नवी मुंबई महानगर पालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणूक होणार आहे.या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी,शिवसेना,काँग्रेसच्या उमेदवारांनी महापौर व उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.राष्ट्रवादीकडून जयवंत सुतार आणि शिवसेनेकडून सोमनाथ वास्कर यांनी महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज भरला आहे तर शिवसेनेकडून द्वारकानाथ भोईर आणि काँग्रेसकडून मंदाकिनी म्हात्रे यांनी उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज भरला आहे.काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दशरथ भगत यांनी उपमहापौर पदाच्या निवडणुकीत बंडखोरी केली आहे.काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष  दशरथ भगत यांच्या पत्नी काँग्रेसच्या नगरसेविका वैजयंती भगत यांनी उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज भरला आहे.दशरथ भगत हे नाराज असल्याचं समजतं.मात्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दशरथ भगत यांची नाराजी कशी दूर करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.सुरुवातीला शिवसेनेकडून महापौर पदासाठी विजय चौगुले यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती.मात्र विजय चौगुले यांनी ऐनवेळी माघार घेतल्याने शिवसेनेकडून महापौर पदासाठी सोमनाथ वास्कर यांनी उमेदवारी अर्ज भरला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here