विवाहांतर्गत बलात्कार

प्रत्यक्षात पती/पत्नींच्या कामजीवनात पत्नीच्या विरोधात, मन, शरीर तयार नसते. तिच्यावर जरब दाखवून संभोग केला जातो. तो बलात्कारच होय.

0

वृत्तपत्र उघडल्यावर स्त्रीवर बलात्कार झाल्याची, बलात्काराचा प्रयत्न, विनयभंग अशा बातम्या वाचावयास मिळतात, त्यामुळे बलात्कार हा फक्त परपुरुषांकडून होतो असा समज तयार झाला आहे. प्रत्यक्षात पती/पत्नींच्या कामजीवनात पत्नीच्या विरोधात, मन, शरीर तयार नसते. तिच्यावर जरब दाखवून संभोग केला जातो. तो बलात्कारच होय. त्याला विवाहांतर्गत बलात्कार म्हणतात किंवा मरायटल रेप (Marital Rape) असे इंग्लिशमध्ये म्हणतात. याचे प्रमाण अधिक दिसते ते प्रगतशील देशात किंवा ज्या देशात धर्माचे अवडंबर जास्त आहे, ज्यात स्त्रीला दैनंदिन जीवनात वावरताना पूर्ण स्वातंत्र्य दिले जात नाही. यात भारताचा समावेश होतो. विवाहित जोडप्यांत पती हा पत्नीची इच्छा आहे की नाही हे विचारात घेत नाही. डॉक्टर मला रोज १-२ वेळा सेक्स लागतोच. पत्नी मदत करते, काही बोलत नाही, तिला सेक्स कमीच आहे अशी वाक्ये ऐकायला मिळतात. प्रत्यक्षात स्त्री पुरुषाला घाबरून, लाजून स्वतःचे मन सांगत नाही. नकार दिल्यास पती बाहेर संभोग करेल, चिडेल म्हणून मूग गिळून गप्प बसले जाते. स्त्रीलादेखील कामेच्छा असते, कामपूर्ती असते. तिलाही संभोगात आनंद मिळत असतो. ती संभोगासाठी प्रत्येक वेळी तयार नसते. हे सत्य पुरुषाला माहिती नसते किंवा मित्राच्या कामजीवनाशी तुलना करण्याची वाईट सवय या पुरुषांना असते. त्यात जिंकण्यासाठी स्वतःच्या पत्नीचा बाहुलीसारखा वापर केला जातो, हे कटू सत्य आहे. कामजीवनाविषयी खरी शास्त्रीय माहिती मिळाल्यानंतर काही पुरुष जागे होतात. काहींचा अहम् दुखावल्यामुळे ते सत्य मान्य करत नाहीत. विवाहपूर्व मार्गदर्शनामध्ये भावी पती-पत्नींना कामजीवन सांगितल्यानंतर, शिकवल्यानंतर हे विवाहांतर्गत बलात्काराचे प्रमाण बरेच कमी होईल यात शंका नाही. काही समाजात स्त्रियांना अजून पुरुषांची गुलामी करावी लागते. भारतातील काही राज्यांत अजूनही स्त्रिया गुलामीत जगत आहेत. तिथे हा बलात्कार फार मोठ्या प्रमाणात होतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here