विवाहाच्या आमिषाने १३ तरुणींना गंडा

शादी डॉट कॉम, जीवनसाथी डॉट कॉम या संकेतस्थळावर बनावट खाते

0

मुंबई – एका विवाहविषयक संकेतस्थळावरून बनावट खाते तयार करून तब्बल १३ तरुणींची फसवणूक करणाऱ्या एका ठकसेनाला नालासोपारा पोलिसांनी बेडय़ा घातल्या. या तरुणींना २५ लाख रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे.

कृष्णा देवकाते (३०) हा आरोपी ठाण्यात पत्नी आणि मुलासह राहतो. त्याने शादी डॉट कॉम आणि जीवनसाथी डॉट कॉम या संकेतस्थळावर आपले बनावट खाते तयार केले होते. रिलायन्स कंपनीत उच्चपदस्थ अधिकारी असून महिन्याला लाखो रुपये पगार असल्याचे त्याने भासवले होते. मुंबई आणि विविध ठिकाणी उच्चभ्रू वसाहतीत सदनिका, बंगले, वडिलोपार्जित जमीन आणि शेती असल्याचे त्याने लिहिले होते. आई-वडील हयात नसून एकुलता एक मुलगा असल्याचे लिहिले होते. त्याच्या प्रोफाईलला अनेक मुली भाळल्या होत्या. नालासोपारा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा आरोपी नोकरदार आणि श्रीमंत मुलींना आपले सावज बनवत असे. मुलींना भेटायला तो हॉटेलात बोलवायचा आणि लग्नास तात्काळ होकार द्यायचा. त्या काळात तो विविध कारण दाखवून मुलींकडून पैसे घ्यायचा. व्यवसायात मंदी, क्रेडिट कार्ड ब्लॉक झाले, शेअर बाजारात भरायचे आहेत, असे सांगून तो पैसे उकळायचा. त्यानंतर आपला मोबाइल कायमस्वरूपी बंद करून पळ काढायचा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here