कोल्हापूरच्या बावनकशी सोनबाच्या मंगोलियातील कामगिरीकडे मराठी कुस्ती जगताचं लक्ष

0

BY Newstale
Correspondent
Murgud 22 March 2019
समीर कटके

आशिया चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या सोनबाचा खडतर सराव…

महाराष्ट्राच्या कुस्ती जगताचं लक्ष कोल्हापूरच्या सोनाबाच्या कामगिरीकडे

तावून सुलाखून निघालेला कोल्हापूरचा बावनकशी ‘सोनबा’ घालतोय अकाशाला साद
आई वडिलांच्या कष्टाचं चीज करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती….

पुण्याचा अभिजित कटके वरिष्ठ गटातील पदकासाठी हरियाणातील सोनपत सराव शिबिरात घेतोय अपार कष्ट…

सोनपत हरियाणा येथे झालेल्या राष्ट्रीय निवड चाचणीत महाराष्ट्रातील अभिजित कटके आणि सोनबा गोंगाने यांची निवड भारतीय संघात झाली.युनायटेड वर्ल्ड रेसलिंग असोसिएशन यांच्या वतीने मंगोलिया(चीन)होणाऱ्या 23 वर्षाखालील आशियायी चॅम्पियन कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघात त्यांची निवड झाली आहे. या स्पर्धेसाठी दोघेही मराठी मल्ल अपार कष्ट घेत आहेत.मंगोलिया चीन येथे 21 तारखेस स्पर्धा सुरू जळू असून 23 मार्च अखेर या स्पर्धा होणार आहेत.

मंगोलिया येथे होणाऱ्या आशियायी चॅम्पियन कुस्ती स्पर्धेसाठी कोल्हापूरचा निगवे खालसा येथील मल्ल सोनबा गोंगाने याची भारतीय संघात निवड झाली.तेवीस वर्षाखालील 61 किलो वजन गटात सोनबा आपले कसब पणाला लावणार आहे.ग्रीको-रोमन आणि फ्री-स्टाईल या दोन प्रकारात आशियायी स्पर्धेत भारतीय तिरंगा फडकावण्यासाठी भारतातील 30 मल्लांचा चमू आंतराष्ट्रीय दर्जाच्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रचंड मेहनत घेत आहे.

सोनाबाच्या आयुष्यातील सुवर्ण क्षण वर्ल्ड चॅम्पिअनशीप स्पर्धेतील क्षणचित्रे

द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त कुस्ती प्रशिक्षक जगविंदर,अर्जुन पुरस्कार विजेते
सुजित मान व राजीव तोमर यांच्या मार्गदर्शनाखाली सोनबा लढत आहे.

गत सालचा महाराष्ट्र केसरी अभिजित कटके यानेही 125 किलो वजन गटात नेत्रदीपक खेळ केला.या वर्षी अभिजितचा महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम लढतीत पराभव झाला होता व त्याचे दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी बहुमान मिळवण्याचे स्वप्न भंगले होते पण त्यानंतरही पराभवाने खचून न जाता प्रबळ इच्छाशक्ती व मेहनतीच्या जोरावर त्याने आंतराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय संघात स्थान मिळवले.अभिजित पुण्याच्या शिवराम वाजे तालमीचा मल्ल आहे.

मंगोलिया येथील उलनबटोर येथे 21 ते 23 मार्च रोजी ही स्पर्धा सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here