औरंगाबाद-
मराठा आरक्षणासाठी ९ ऑगस्ट रोजी मुंबईत मोर्चा धडकणार आहे. ‘एक मराठा, लाख मराठा’ चा नारा देत मोर्चा काढण्यात येत आहे. या ‘मराठा क्रांती मुक मोर्चा’ यशस्वी करण्यासाठी बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील काही मुस्लिम बांधव पुढे आले आहेत. मराठा मोर्चाला जाणाऱ्या वाहनांच्या दुरुस्तीचे काम ते करणार आहेत.
माजलगाव येथील रियाझ काझी आणि त्याचे मित्र मिळून हा उपक्रम राबवणार आहेत. यावेळी एकाने मराठा मोर्चासाठी तुम्ही काय करणार असे विचारले. त्यावेळी आम्ही वाहने दूरस्त करतो, तेच काम मार्चात करू असे त्यांनी सांगितले आणि चर्चेतून या पथकाचा जन्म झाला. माजलगावमधील वाहन दुरस्त करणाऱ्या सहकाऱ्यांना सोबत घेत त्यांनी पथक तयार केले. सुरुवातीला माजलगाव तालुक्यापुरत मर्यादित काम करण्याचे ठरले होते. मात्र, या संकल्पनेला भरभरून प्रतिसाद मिळाला. त्यामुळे त्यानी बीड जिल्ह्यात हा उपक्रम राबवायचा निर्णय घेतला असे पथकातील सदस्य असलेल्या कादरभाई यांनी सांगितले.