महिलांच्या सबलीकरणासाठी प्रयत्नशील नवोदिता घाटगे यांचे प्रतिपादन

करनूर येथे गांडूळ खत निर्मिती प्रकल्पाचा शुभारंभ

0

करनूर वार्ताहर :  ग्रामीण भागातील महिलांसाठी काय केले पाहिजे याचा विचार करून गांडूळखत प्रकल्प सुरु करीत आहोत. महिला ही कुटुंबाचा कणा आहे. त्या पतीच्या खांद्याला खांदा लावून काम करत असतात. गांडूळ खतामधून चांगले पैसे मिळू शकतात. महिलांच्या उन्नतीसाठी हा प्रकल्प फायदेशीर ठरेल, असा विश्वास जिजाऊ महिला संघटनेच्या कार्याध्यक्ष नवोदिता घाटगे यांनी व्यक्त केला.
करनूर (ता. कागल) येथील तानाजी कुंभार यांच्या प्रांगणात राजे विक्रमसिंह घाटगे फौंडेशन, राजमाता जिजाऊ महिला समिती, छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना व शाहू कृषी सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने गांडूळ खत प्रकल्प शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी करणसिंह घाटगे होते.
यावेळी नवोदित घाटगे म्हणाले, गांडूळ प्रकल्पातून तयार झालेले खत शाहू कृषी संघ खरेदी करेल. यामुळे महिलांना आर्थिक लाभ होईल. ग्रामीण महिला सक्षम व सुरक्षित राहिली पाहिजे. या प्रकल्पासाठी जास्तीत जास्त महिलांनी पुढाकार घ्यावा, असे सांगितले.
समरजितसिंह घाटगे म्हणाले, महिलांच्या सबलीकरणासाठी आपण कागल तालुका व गडहिंग्लज परिसरात गावोगावी जाऊन महिलांचे प्रबोधन केले आहे. आम्ही महिला सबलीकरणासाठी प्रयत्न करीत आहोत. निवडणुकीच्या तोंडावर पंढरपूर, तुळजापूरला महिलांना पाठवून त्यांचे सबलीकरण होणार नाही, असा टोला समरजितसिंह घाटगे यांनी लगावला. महिलांना त्यांच्या पायावर उभे राहण्याची संधी देत आहोत. गांडूळ खताच्या प्रकल्पासाठी राजे बँकेकडून अर्थसहाय्य होणार आहे. या प्रकल्पातून महिलांना महिन्याला ५ हजार रुपये फायदा मिळेल. तर सरकारकडून या प्रकल्पासाठी ११५०० रुपये सबसिडी मिळणार आहे. यासंदर्भात शाहू ग्रुपतर्फे महिलांना प्रशिक्षण देणार आहेत. हे येणारे पैसे महिलांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत. हा पहिलाच प्रयोग महिलांना सक्षम करण्यासाठी आम्ही राबवत आहोत. आण्णासाहेब पाटील महामंडळ अर्थसहाय्य योजनेतून व्यवसाय सुरु करता येईल याचाही लाभ घ्यावा. आरोग्याच्या दृष्टीने महिला पूर्ण कुटुंबाची काळजी घेते. पण स्वतःची काळजी घेत नाही. कॅन्सरबाबत स्पष्ट बोलून राजे फौंडेशनमधून यावरती उपचार केले जातील. २ फेब्रुवारी रोजी पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत कामगारांसाठी आरोग्य शिबीर घेत आहोत. राजकीय नेत्यांपुढे हात पसरायचे नाही. महिलांनी सक्षम बनायचे.
यावेळी समरजितसिंग घाटगे व नवोदित घाटगे यांच्या हस्ते प्रभावती कृष्णात चव्हाण, रुपाली शरद चव्हाण यांच्या गांडूळ खत प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ऊस विकास अधिकारी के.बी. पाटील यांनी गांडूळ खत प्रकल्पा संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी पल्लवी करणसिंह घाटगे, जयसिंग कांबळे यांनीही मनोगत व्यक्त केले. स्वागत ग्रा. पं. सदस्य पूनम धनगर यांनी केले. प्रास्ताविक के.बी. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन राजेंद्र मालूमल यांनी केला. कार्यक्रमास तानाजी कुंभार, विक्रमसिंह घाटगे – वंदूरकर, ग्रा.पं. सदस्य लक्ष्मण भंडारे, गणपती चौगुले, बाळासो चौगुले, आनंदराव पाटील, विमल चौगुले, आक्काताई कुंभार, संगीता पाटील, सुनीता घाटगे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here