मातृत्व….कर्तृत्व…..नेतृत्वाचा अनोखा संगम नारी….

0

गडहिंग्लज (प्रा. श्रृती पाटील) :

#जागतिक महिला दिन विशेष#

आजचा दिवस हा महिलेसाठी सन्मानाचा, अभिमानाचा तिच्या सन्मानाचा म्हणून ओळखला जातो. ८ मार्च १९४३ रोजी भारतात मुंबई येथे पहिला ‘महिला दिन’ साजरा करण्यात आला. यापूर्वी आपल्या संस्कृतीमध्ये महिला म्हणजे ‘चूल आणि मूल’ यापलीकडे तिला काही स्वतःच अस्तित्व नव्हतं. तो एक काळ होता कि तिथे स्त्रिया पुरुषांसमोर एक शब्दही बोलत नव्हत्या. स्वतःचे निर्णय त्या स्वतः घेऊ शकत नव्हत्या. पण आताची नारी ही मातृत्व…. कर्तृत्व… आणि नेतृत्व या गुणांचा संगम असलेली…
निसर्गदत्त देणगी लाभलेली…
महान शक्ती म्हणजे नारीशक्ती…

आज असं कोणतंच क्षेत्र नाही की जिथे महिलांनी यश मिळवलं नाही. अगदी कंडक्टरपासून, कलेक्टरपर्यंत, सरपंच पासून, राष्ट्रपतीपर्यंत, बसकंडक्टरपासून वैमानिकापर्यंत आज महिलांनी स्वबळाने धाडसाने, निच्छयाने झेप घेतली आहे. स्त्रीला वारंवार आपल्या संस्कृतीला जाणीव करून दिली जाते की तुझ्या हाती पाळण्याची दोरी पण आजची स्त्री हि इतकी खंबीर व धाडसी झाली आहे की स्वतःच्या जबाबदारीची जाणीव ठेवून ती स्वतःच्या निर्णयक्षमतेने सर्व कुटुंबाची काळजी सोबत आपलं ध्येय ही पूर्ण करत चालली आहे.

स्त्री कितीही शिकली, मिळवती झाली मोठ्या पदावर काम करणारी झाली संशोधक झाली, अंतराळात गेली, सभा-व्यासपीठ गाजवत असली, राजकारणात अग्रेसर असली तरीही… तिची शारीरिक क्षमता पुरुषापेक्षा कमी असते पण यावर उपायही आहेत ते आपण सध्या जास्त विचारात घेतले पाहिजे. ते म्हणजे मुलींनी कराटे, मुष्ठीयुद्ध यासारख्या प्रतिकारात्मक खेळ शिकायला हवेत नाहीतर आणखी काही वर्षांनी या भूतलावर काय विपरीत स्थिती होईल ! मुलांना पुढच्या काळात नातेवाईक कुठून मिळणार, भाऊ-वहिनी, बहिणी-काकी अशी नाती उरणारच नाहीत….”

त्यामुळे मुलींचा जन्मदरवाढलाच पाहिज. “बेटी बचाओ बेटी पढाओ” , “आईशिवाय बाळाचा जन्मच नाही”. आईची महती संत महात्मांनी गायिली आहे. आई माझा गुरु, आई माझी कल्पतरू, सौख्याचा सागर आई माझी असं असूनही स्त्रीला गौणत्य देणं किती अन्यायाच आहे ? म्हणून स्त्रीकडे आदर्शपूर्व सन्मानाने एक माणूस म्हणून विचार करा…..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here