पाच ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीत महाराष्ट्राचा वाटा एक ट्रिलियन डॉलरचा असेल – मुख्यमंत्री

टीआयई ग्लोबल समिट

0

मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सन 2025 पर्यंत भारत पाच ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी बनेल असा विश्वास व्यक्त केला असून यामध्ये महाराष्ट्राचा वाटा एक ट्रिलियन डॉलरचा राहील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. जे डब्ल्यू मॅरिएट येथे टीआयई ग्लोबल समिट आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी फडणवीस यांनी देश आणि राज्यभरातून आलेल्या उद्योजकांशी संवाद साधला.

या समिटमध्ये फडणवीस म्हणाले, कालच राज्याच्या औद्योगिक वाढीसाठी उपयुक्त असलेल्या मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स 2018 चा समारोप झाला. जागतिक स्तरावर गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी राज्यात मेक इन इंडियानंतर अशा प्रकारची परिषद आयोजित करण्यात आली होती. मॅग्नेटिक महाराष्ट्रमध्ये एकूण 4 हजारहून अधिक सामंजस्य करार करण्यात आले. तीन दिवसांमध्ये एकूण 16 लाख कोटी रुपयांच्या उद्योगांचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. महाराष्ट्र हे उद्योजकांसाठीचे पहिल्या पसंतीचे राज्य असून गेल्या वर्षी देशाच्या परकीय थेट गुंतवणुकीपैकी महाराष्ट्रात एकूण 51 % गुंतवणूक आली होती. त्यामुळे येणाऱ्या काळात महाराष्ट्रात निर्माण करण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधा आणि इज ऑफ डुईंग बिझनेस यामधील सुलभता यामुळे अधिकाधिक उद्योजक महाराष्ट्रात गुंतवणूक करतील. आज भारताकडे असलेले कुशल मनुष्यबळ, बुद्धी याचा वापर वाढविण्यासाठी आगामी काळात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापरही करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here