महागाव अपघातातील मृतांच्या वारसांना मदतीसाठी प्रस्ताव

0

 

कोल्हापूर : गडहिंग्लज तालुक्यातील महागाव रोडवर शनिवारी झालेल्या विविध अपघातांत सहाजणांचा मृत्यू झाला. त्यांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदतीसाठी महसूल प्रशासनाने प्रस्ताव पाठविले. मानवतेच्या भूमिकेने हे प्रस्ताव दिल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. हरळीजवळ चारचाकी झाडावर आदळल्याने वासंती मारुती नांदवडेकर (वय ३५), सोहम मारुती नांदवडेकर (वय १०, रा. सावतवाडी तर्फ नेसरी) या मायलेकांचे निधन झाले. दुसऱ्या घटनेत बस आणि टाटा सुमो यांच्यात अपघात झाला. सुमोतील चंद्रकांत मारुती गरुड (वय ६५), नामदेव सदाशिव चव्हाण (वय ५०), आप्पा रावजी सुपले (वय ५२), मनोज नामदेव चव्हाण (वय २४, सर्व रा. नूल, ता. गडहिंग्लज) यांचा मृत्यू झाला. त्यांच्या वारसांना सरकारी मदतीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here