जोडण्या लावण्यामध्ये महाडिकांची आघाडी

0

 

कोल्हापूर (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणूकिसाठी २३ एप्रिल रोजी मतदान होत आहे. कोल्हापूर मतदारसंघांत राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक व शिवसेनेचे प्रा. संजय मंडलिक यांच्यात काँटे कि टक्कर होत आहे. दिवसागणिक चुरस वाढत आहे. विद्यमान खासदार महाडिक यांच्याबद्दल जनतेत नाराजी होती पण ती नाराजी बर्‍यापैकी दूर करण्यात महाडिक आणी कंपनीला यश आले आहे. त्यांच्या प्रचारात अनेकजण दिलसे सहभागी झाले आहे. तरिसुध्दा विविध प्रकारच्या जोडण्यात लावण्यात महाडिक आघाडीवर आहेत. त्यामुळे त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. यामुळे सुरवातीला मंडलिक यांच्यासाठी सोपी वाटणारी ही निवडणूक चुरशीची बनली आहे. त्यामुळे विजयाचा दोलायमान दोनही बाजूला झुकत असल्याचे चित्र आहे.

ही निवडणूक जरी धनंजय महाडीक व प्रा. संजय मंडलिक यांच्यात होत असली तरिही या निमित्ताने माजी आमदार महादेवराव महाडिक व आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. निवडणूकीच्या सुरूवातीपासूनच प्रा. मंडलिक यांना जनतेतून प्रतिसाद मिळत आहे असे चित्र निर्माण झाले. त्यामुळे निवडणूक महादेवराव महाडिक यांनी स्वत:च्या हातामध्ये घेतली. त्यांचे “पर्नसल नेटवर्क” खूपच ताकदवान आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यात त्यांचे कार्यकर्ते पसरले आहेत. त्यांनी प्रत्येकाला चार्ज केले आहे. मात्र दुसरीकडे मंडलिकांचे स्वत:ची यंत्रणा दिसून येत नाही. त्यांच्यासाठी बंटी पाटील व भाजपा शिवसेनेचे कार्यकर्ते राबत आहेत. पण त्यांना मर्यादा येत आहेत. त्यामुळेच सगळे वातावरण पोषक असताना यावेळी तरी मंडलिक डाव साधणार का? हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

निवडणूक चुरशीची बनली आहे. दोनही उमेदवारांना विजयाची समान संधी आहे. निवडणूकीच्या सुरवातीला महाडिक यांना प्रचंड विरोध झाला. त्यातूनही सावरत महाडिक यांनी आपल्या वैयक्तिक जोडण्यामधूनच आपल्या विजयाची दावेदारी कायम ठेवली. याचबरोबर मात्र मंडलिक यांना योग्य वातावरण असतानाही अजूनही आपला नॉट रिचेबलचा शिक्का पुसता आला नाही. मंडलिक यांच्या प्रचार यंत्रणेतील प्रत्येकाला आपल्या स्थानिक राजकारणाची चिंता आहे. त्यामुळे आपल्या प्रचार यंत्रणेतील धोक्यांचा विचार मंडलिक यांनी केलेला दिसत नाही. त्यामुळे मंडलिक यांच्यासाठी धोका वाढला आहे. यातून त्यांनी बोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे कोल्हापूर लोकसभेतील लढत चुरशीची बनली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here