एम. आर. प्रशालेत ‘राष्ट्रीय मतदान दिनानिमित्त’ विविध स्पर्धेचे आयोजन

0

गडहिंग्लज : येथील एम. आर. प्रशालेत २५ जानेवारी ‘राष्ट्रीय मतदान दिनानिमित्त’ विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कनिष्ठ महाविद्यालयीन गटामध्ये निबंधलेखन,वक्तृत्व, चित्रकला, घोषवाक्य, रांगोळी स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद दिसून येत आहे. ‘मतदार राजा जागा हो, मतदानाचे महत्व, ‘मतदान जगरुकता’, ‘मतदान अधीकारी’ या विषयावर निबंधलेखन व वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या. आज रांगोळी स्पर्धेमध्ये निवडणुकीसंदर्भात सामाजिक जनजागृतीसाठी विदयार्थ्यांनी विषय घेतले आहेत. तसेच उद्या पुष्परचना स्पर्धा घेण्यात येईल असे सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. सुषमा पाटील यांनी पत्रकाद्वारे सांगितले आहे.
यासाठी प्राचार्य एम. एस. नाईक, प्रा. ए. ए. मगर, प्रा. आर. के. कोडोली, प्रा. बी. टी. यादव, शेख एस. एस., पेडणेकर एस. एस., माजी प्राचार्य एम. बी. कुंभार व इतर सर्व शिक्षकवृंदाचे सहकार्य लाभले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here