लोकशाही सुदृढ राहण्यासाठी प्रयत्न करुया –सुनिल तटकरे

संसदीय प्रणाली व संविधानाच्या रक्षणासाठी लोकशाही मार्गाने निकराने झुंज देवू

0

मुंबई : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेनुसार देशाची गौरवशाली वाटचाल गेली ६८ वर्ष सुरु असतानाच सध्या संविधानावर घाला घालण्याचा प्रयत्न काही शक्तींकडून होत असून लोकशाही सुदृढ राहण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केले.

आज भारताचा ६९ वा प्रजासत्ताक दिन राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन साजरा करण्यात आला.

आज प्रजासत्ताक दिनी आपण सगळ्यांनी आज संकल्प करुया की,आपल्या देशाची एकात्मता,अखंडत्व आणि धर्मनिरपेक्षतेला धक्का लागू देणार नाही. आपली संसदीय प्रणाली व संविधानाच्या रक्षणासाठी लोकशाही मार्गाने निकराने झुंज देवू व देशाला पुढे नेवू असे आवाहन सुनिल तटकरे यांनी केले आणि सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here