डहाणूत बिबट्या जेरबंद

वाईल्डलाईफ कंझरर्वेशन अँड अनिमल वेल्फेअर असोसियशनच्या टीमला यश

0

प्रतिनिधी- योगेश चांदेकर

डहाणू : 17 जानेवारीला सकाळी अकराच्या सुमारास सोगवे गट नंबर 11 च्या ग्रामस्थानी लावलेल्या रानडुक्कर पकडण्याचा तारेच्या सापळ्यात बिबट्या अडकल्याची घटना घडलीय. साफळ्यात बिबट्या अडकल्याने गावात एकच  खळबळ उडाली. या बाबत ग्रामस्थांनी खबर दिल्यावर डहाणू वन विभाग आणि वाईल्डलाईफ कंझरर्वेशन अँड अनिमल वेल्फेअर असोसियशनच्या टीमने दुपारी पावणेदोनच्या सुमारास बिबट्याला पिंजरा लाऊन पकडले. त्यानंतर त्याला पारनाका येथील उपवन संरक्षक कार्यालयाच्या कासव पुनर्वसन केंद्रात हलविण्यात आले. सापळ्यात अडकल्याने त्याला कोणतीही इजा झाली नाही. पाच ते सहा वर्षीय नर जातीचा हा बिबट्या असून त्याचे वजन 50 किलो असल्याचे सहाय्यक वनसंरक्षक डी. जे. पवार यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here