‘भूमीनंदन’ चा आज शेवटचा दिवस

0

गडहिंग्लज : रमेशराव रेडेकर युवा फाउंडेशनतर्फे भूमीनंदन महोत्सवांतर्गत सुरू असलेल्या कृषी प्रदर्शनाचा आज (दि.२४)शेवटचा दिवस आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी गडहिंग्लज,आजरा,चंदगड तालुक्यासह कागल,गारगोटी व सीमाभागातील शेतकऱ्यांची गर्दी होत आहे.
दरम्यान, आज शेवटच्या दिवशी दूध काढणी यंत्रावर ३००० रुपयांची सवलत असणार आहे. तसेच सायंकाळी ५ वाजता मूकबधिर विध्यार्थ्यांच्या हस्ते लकी ड्रॉची सोडत काढून विजेत्यांची नावे घोषित करणार आहेत.
पहिल्या दिवसापासून या प्रदर्शनाने गर्दी खेचली आहे.दुसऱ्या व तिसऱ्या दिवशीही प्रत्येक स्टॉलवर रिघ लागली होती. प्लास्टिक मुक्तीसाठी लावलेल्या कापडी पिशव्यांच्या स्टॉललाही महिलांनी भेट देऊन खरेदी केली. कडलगे येथील १७ फुटी ऊस आणि मुत्नाळ येथील अडीच वर्षाचा रेडा लक्षवेधी ठरत आहे.
उसाच्या अनेक जाती प्रदर्शनात समाविष्ट आहेत. नाचणी, आवळा, सेंद्रिय गुळावर प्रक्रिया करून तयार केलेल्या पदार्थांना या प्रदर्शनाच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. घरगुती लोणचे,पापडनाही मागणी आहे.कृषी क्षेत्राशी निगडित सोलर पंप, अवजारे, हलक्या वजनाच्या विटा, तुषार, ठिबक संच,पशुखाद्य आदी स्टॉल ही सहभागी झाले आहेत.
तसेच फर्निचर, बांबू झोपाळे, मातीच्या वस्तू, कपड्यांचे स्टॉल वर ही लोकांची गर्दी जास्त दिसून येत आहे. येथील तालुक्यातील भूमिपुत्रांना रेडेकर फाउंडेशन मार्फत एक भव्य व्यासपीठ तयार झाले आहे.
आज या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे तरी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून ह्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन युवा फाउंडेशन चे अध्यक्ष आदित्य रेडेकर, मार्गदर्शक रमेशराव रेडेकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here