चारा घोटाळा प्रकरणात लालूंना साडेतीन वर्षांचा तुरुंगवास

लालू प्रसाद यादव जाणार तुरुंगात

0

रांचीतील विशेष सीबीआय कोर्टाने बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना साडेतीन वर्षांचा कारावास आणि पाच लाख रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. दंडाची रक्कम भरली नाही तर लालू प्रसाद यादव यांना अधिक सहा तुरुंगात रहावं लागेल.

मागील काही दिवसांपासून लालू प्रसाद यादव यांना कोणती शिक्षा होणार याची चर्चा सगळीकडे सुरु होती. अखेल सीबीआय कोर्टाने आज निकाल देत लालूंना शिक्षा सुनावली.

लालू प्रसाद यादव बिहारचे मुख्यमंत्री असताना पशूपालन विभागाची बनावट बिलं देऊन चाऱ्याच्या नावाने सरकारी तिजोरीतून रक्कम काढलेली. यामध्ये अधिकारी, ठेकेदार राजकीय नेत्यांचाही हात होता. चारा घोटाळ्याला 1990 साली सुरुवात झाली होती. चाईंबासा खटल्यात लालूप्रसाद यादव यांना 2013 साली पाच वर्षांची शिक्षा झाली होती. मात्र ते जामिनावर ते बाहेर आहेत. या घोटाळ्यात 38 आरोपी होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here